السجدة

تفسير سورة السجدة

الترجمة الماراتية

मराठी

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ الم﴾

१. अलिफ. लाम. मीम १

﴿تَنْزِيلُ الْكِتَابِ لَا رَيْبَ فِيهِ مِنْ رَبِّ الْعَالَمِينَ﴾

२. निःसंशय, हा ग्रंथ सर्व विश्वांच्या पालनकर्त्यातर्फे अवतरित झाला आहे.

﴿أَمْ يَقُولُونَ افْتَرَاهُ ۚ بَلْ هُوَ الْحَقُّ مِنْ رَبِّكَ لِتُنْذِرَ قَوْمًا مَا أَتَاهُمْ مِنْ نَذِيرٍ مِنْ قَبْلِكَ لَعَلَّهُمْ يَهْتَدُونَ﴾

३. काय हे असे म्हणतात की याने हा ग्रंथ मनाने रचून घेतला आहे?१ मुळीच नाही.
किंबहुना हा तुमच्या पालनकर्त्यातर्फे सत्य आहे, यासाठी की तुम्ही त्यांना भय दाखवावे, ज्यांच्याजवळ तुमच्यापूर्वी कोणी भय दाखविणारा आला नाही. संभवतः ते सत्य मार्गावर यावेत.

﴿اللَّهُ الَّذِي خَلَقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ وَمَا بَيْنَهُمَا فِي سِتَّةِ أَيَّامٍ ثُمَّ اسْتَوَىٰ عَلَى الْعَرْشِ ۖ مَا لَكُمْ مِنْ دُونِهِ مِنْ وَلِيٍّ وَلَا شَفِيعٍ ۚ أَفَلَا تَتَذَكَّرُونَ﴾

४.
अल्लाह तो आहे, ज्याने आकाशांना आणि धरतीला आणि जे काही त्यांच्या दरम्यान आहे, सर्व काही सहा दिवसांत निर्माण केले, मग अर्श (ईशसिंहासना) वर उच्च झाला.
तुमच्याकरिता, त्याच्याखेरीज कोणीही मदत करणारा, शिफारस करणारा नाही, मग काय तरीही तुम्ही बोध ग्रहण करीत नाही?

﴿يُدَبِّرُ الْأَمْرَ مِنَ السَّمَاءِ إِلَى الْأَرْضِ ثُمَّ يَعْرُجُ إِلَيْهِ فِي يَوْمٍ كَانَ مِقْدَارُهُ أَلْفَ سَنَةٍ مِمَّا تَعُدُّونَ﴾

५.
तो आकाशापासून धरतीपर्यंत कार्य-व्यवस्था करतो, मग (ते कार्य) एका अशा दिवसात त्याच्या दिशेने वर चढते, ज्याचे अनुमान तुमच्या हिशोबाच्या एक हजार वर्षांइतके आहे.

﴿ذَٰلِكَ عَالِمُ الْغَيْبِ وَالشَّهَادَةِ الْعَزِيزُ الرَّحِيمُ﴾

६. तोच विद्यमान आणि अपरोक्षाचा जाणणारा आहे, जबरदस्त वर्चस्वशाली, मोठा मेहेरबान.

﴿الَّذِي أَحْسَنَ كُلَّ شَيْءٍ خَلَقَهُ ۖ وَبَدَأَ خَلْقَ الْإِنْسَانِ مِنْ طِينٍ﴾

७. त्याने जी वस्तु देखील बनविली खूप सुंदर बनविली आणि मानवाची निर्मिती मातीपासून सुरू केली.

﴿ثُمَّ جَعَلَ نَسْلَهُ مِنْ سُلَالَةٍ مِنْ مَاءٍ مَهِينٍ﴾

८. मग त्याचा वंश एका तुच्छ पाण्याच्या सार तत्त्वाने बनविला.

﴿ثُمَّ سَوَّاهُ وَنَفَخَ فِيهِ مِنْ رُوحِهِ ۖ وَجَعَلَ لَكُمُ السَّمْعَ وَالْأَبْصَارَ وَالْأَفْئِدَةَ ۚ قَلِيلًا مَا تَشْكُرُونَ﴾

९.
ज्याला यथायोग्य करून, त्यात आपला प्राण (रुह) फुंकला, आणि त्यानेच तुमचे कान, डोळे आणि हृदय बनविले (तरीदेखील) तुम्ही फारच कमी कृतज्ञता दाखविता.

﴿وَقَالُوا أَإِذَا ضَلَلْنَا فِي الْأَرْضِ أَإِنَّا لَفِي خَلْقٍ جَدِيدٍ ۚ بَلْ هُمْ بِلِقَاءِ رَبِّهِمْ كَافِرُونَ﴾

१०.
आणि ते म्हणाले की काय आम्ही जेव्हा जमिनीत मिसळून हरवले जाऊ, काय मग पुन्हा नव्या जीवनात येऊ? खरी गोष्ट अशी की या लोकांना आपल्या पालनकर्त्याच्या भेटीचा विश्वासच नाही.

﴿۞ قُلْ يَتَوَفَّاكُمْ مَلَكُ الْمَوْتِ الَّذِي وُكِّلَ بِكُمْ ثُمَّ إِلَىٰ رَبِّكُمْ تُرْجَعُونَ﴾

११.
त्यांना सांगा, तुम्हाला मृत्युचा फरिश्ता मरण देईल जो तुमच्यावर तैनात केला गेला आहे, मग तुम्ही सर्व आपल्या पालनकर्त्याकडे परतविले जाल.

﴿وَلَوْ تَرَىٰ إِذِ الْمُجْرِمُونَ نَاكِسُو رُءُوسِهِمْ عِنْدَ رَبِّهِمْ رَبَّنَا أَبْصَرْنَا وَسَمِعْنَا فَارْجِعْنَا نَعْمَلْ صَالِحًا إِنَّا مُوقِنُونَ﴾

१२.
आणि जर तुम्ही यांना (त्या वेळच्या अवस्थेत) पाहिले असते, जेव्हा दुराचारी लोक आपल्या पालनकर्त्यासमोर नतमस्तक असतील, म्हणतील की हे आमच्या पालनकर्त्या! आम्ही पाहिले आणि ऐकले, आता तू आम्हाला परत पाठवशील तर आम्ही सत्कर्म करू. आम्ही ईमान राखणारे आहोत.

﴿وَلَوْ شِئْنَا لَآتَيْنَا كُلَّ نَفْسٍ هُدَاهَا وَلَٰكِنْ حَقَّ الْقَوْلُ مِنِّي لَأَمْلَأَنَّ جَهَنَّمَ مِنَ الْجِنَّةِ وَالنَّاسِ أَجْمَعِينَ﴾

१३.
आणि आम्ही इच्छिले असते तर प्रत्येक माणसाला मार्गदर्शन प्रदान केले असते, परंतु माझी ही गोष्ट पूर्णतः खरी ठरली आहे की मी अवश्य जहन्नमला माणसांनी व जिन्नांनी भरून टाकीन.

﴿فَذُوقُوا بِمَا نَسِيتُمْ لِقَاءَ يَوْمِكُمْ هَٰذَا إِنَّا نَسِينَاكُمْ ۖ وَذُوقُوا عَذَابَ الْخُلْدِ بِمَا كُنْتُمْ تَعْمَلُونَ﴾

१४. आता तुम्ही आपल्या त्या दिवसाच्या भेटीला विसरण्याची गोडी चाखा. आम्हीही तुम्हाला विसरलो, आपण केलेल्या कर्मांच्या (दुष्परिणती) द्वारे निरंतर शिक्षा- यातनेची गोडी चाखा.

﴿إِنَّمَا يُؤْمِنُ بِآيَاتِنَا الَّذِينَ إِذَا ذُكِّرُوا بِهَا خَرُّوا سُجَّدًا وَسَبَّحُوا بِحَمْدِ رَبِّهِمْ وَهُمْ لَا يَسْتَكْبِرُونَ ۩﴾

१५.
आमच्या आयतींवर केवळ तेच लोक ईमान राखतात, ज्यांना जेव्हा जेव्हा शिकवण दिली जाते तेव्हा सजद्यात जातात (माथा टेकतात) आणि आपल्या पालनकर्त्याची प्रशंसेसह तस्बीह (गुणगान) करतात आणि गर्वापासून अलिप्त राहतात.

﴿تَتَجَافَىٰ جُنُوبُهُمْ عَنِ الْمَضَاجِعِ يَدْعُونَ رَبَّهُمْ خَوْفًا وَطَمَعًا وَمِمَّا رَزَقْنَاهُمْ يُنْفِقُونَ﴾

१६. त्यांची कूस आपल्या बिछान्यांपासून अलग राहते. आपल्या पालनकर्त्याला भय आणि आशेसह पुकारतात आणि जे काही आम्ही त्यांना देऊन ठेवले आहे त्यातून खर्च करतात.

﴿فَلَا تَعْلَمُ نَفْسٌ مَا أُخْفِيَ لَهُمْ مِنْ قُرَّةِ أَعْيُنٍ جَزَاءً بِمَا كَانُوا يَعْمَلُونَ﴾

१७. कोणताही जीव जाणत नाही, जे काही आम्ही त्यांच्या डोळ्यांची शितलता त्यांच्यासाठी लपवून ठेवली आहे. ते जे काही करीत होते, हा त्याचा मोबदला आहे.

﴿أَفَمَنْ كَانَ مُؤْمِنًا كَمَنْ كَانَ فَاسِقًا ۚ لَا يَسْتَوُونَ﴾

१८. काय तो, जो ईमान राखणारा असेल, त्या माणसासारखा आहे, जो दुराचारी असेल? दोन्ही कदापि समान ठरू शकत नाही.

﴿أَمَّا الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ فَلَهُمْ جَنَّاتُ الْمَأْوَىٰ نُزُلًا بِمَا كَانُوا يَعْمَلُونَ﴾

१९.
ज्या लोकांनी ईमान स्वीकारले आणि जे सत्कर्म करीत राहिले, त्यांच्यासाठी सदैवकाळ असणारी जन्नत आहे, अतिथ्य आहे त्यांच्या कर्मांच्या मोबदल्यात जे ते करीत होते.

﴿وَأَمَّا الَّذِينَ فَسَقُوا فَمَأْوَاهُمُ النَّارُ ۖ كُلَّمَا أَرَادُوا أَنْ يَخْرُجُوا مِنْهَا أُعِيدُوا فِيهَا وَقِيلَ لَهُمْ ذُوقُوا عَذَابَ النَّارِ الَّذِي كُنْتُمْ بِهِ تُكَذِّبُونَ﴾

२०.
तथापि ज्यांनी अवज्ञा केली तर त्यांचे ठिकाण जहन्नम आहे, जेव्हा जेव्हा ते त्यातून बाहेर पडू इच्छितील, पुन्हा त्यातच परतविले जातील आणि त्यांना सांगितले जाईल, आपल्या खोटे ठरविण्यापायी आगीची गोडी चाखा.

﴿وَلَنُذِيقَنَّهُمْ مِنَ الْعَذَابِ الْأَدْنَىٰ دُونَ الْعَذَابِ الْأَكْبَرِ لَعَلَّهُمْ يَرْجِعُونَ﴾

२१.
आणि निःसंशय, आम्ही त्यांना निकटच्या काही लहान शिक्षा - यातना,१ त्या मोठ्या अज़ाबच्या व्यतिरिक्त चाखवू यासाठी की त्यांनी रुजू व्हावे.

﴿وَمَنْ أَظْلَمُ مِمَّنْ ذُكِّرَ بِآيَاتِ رَبِّهِ ثُمَّ أَعْرَضَ عَنْهَا ۚ إِنَّا مِنَ الْمُجْرِمِينَ مُنْتَقِمُونَ﴾

२२.
आणि त्याहून अधिक अत्याचारी कोण आहे, ज्याला अल्लाहच्या आयतींद्वारे प्रवचन दिले जावे तरीही त्याने त्यापासून तोंड फिरवावे. निश्चितच आम्हीही दुराचाऱ्यांशी सूड (बदला) घेणार आहोत.

﴿وَلَقَدْ آتَيْنَا مُوسَى الْكِتَابَ فَلَا تَكُنْ فِي مِرْيَةٍ مِنْ لِقَائِهِ ۖ وَجَعَلْنَاهُ هُدًى لِبَنِي إِسْرَائِيلَ﴾

२३.
आणि वस्तुतः आम्ही मूसाला ग्रंथ प्रदान केला तेव्हा तुम्ही त्याच्या प्राप्तीसंबंधी कधीही संशय करू नये आणि आम्ही त्यास इस्राईलच्या संततीच्या मार्गदर्शनाचे साधन बनविले.

﴿وَجَعَلْنَا مِنْهُمْ أَئِمَّةً يَهْدُونَ بِأَمْرِنَا لَمَّا صَبَرُوا ۖ وَكَانُوا بِآيَاتِنَا يُوقِنُونَ﴾

२४.
आणि आम्ही त्यांच्यापैकी ज्याअर्थी त्या लोकांनी सहनशीलता राखली असे नेते (प्रमुख) बनविले, जे आमच्या आदेशाने लोकांना मार्गदर्शन करीत होते आणि आमच्या आयतींवर विश्वास ठेवत होते.

﴿إِنَّ رَبَّكَ هُوَ يَفْصِلُ بَيْنَهُمْ يَوْمَ الْقِيَامَةِ فِيمَا كَانُوا فِيهِ يَخْتَلِفُونَ﴾

२५.
निःसंशय, तुमचा पालनकर्ता त्या सर्वांच्या दरम्यान या सर्व गोष्टींचा फैसला कयामतच्या दिवशी करेल, ज्या गोष्टींमध्ये ते मतभेद करीत आहेत.

﴿أَوَلَمْ يَهْدِ لَهُمْ كَمْ أَهْلَكْنَا مِنْ قَبْلِهِمْ مِنَ الْقُرُونِ يَمْشُونَ فِي مَسَاكِنِهِمْ ۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَاتٍ ۖ أَفَلَا يَسْمَعُونَ﴾

२६.
काय या गोष्टीनेही त्यांना मार्गदर्शन प्रदान केले नाही की आम्ही त्यांच्या पूर्वीच्या अनेक जमातींना नष्ट करून टाकले, ज्यांच्या वस्त्यांमध्ये हे चालत फिरत आहेत. निश्चितच त्यात मोठे बोध आहेत. काय तरीही हे ऐकत नाही?

﴿أَوَلَمْ يَرَوْا أَنَّا نَسُوقُ الْمَاءَ إِلَى الْأَرْضِ الْجُرُزِ فَنُخْرِجُ بِهِ زَرْعًا تَأْكُلُ مِنْهُ أَنْعَامُهُمْ وَأَنْفُسُهُمْ ۖ أَفَلَا يُبْصِرُونَ﴾

२७.
काय हे पाहत नाही की आम्ही पाण्याला पडीक (नापीक) जमिनीकडे वाहवून नेतो, मग त्याद्वारे आम्ही शेतींना उगवितो, ज्यास त्यांची गुरे-ढोरे आणि ते स्वतःही खातात. काय तरीही यांना दिसून येत नाही?

﴿وَيَقُولُونَ مَتَىٰ هَٰذَا الْفَتْحُ إِنْ كُنْتُمْ صَادِقِينَ﴾

२८. आणि म्हणतात, हा फैसला केव्हा होईल? जर तुम्ही सच्चे असाल तर सांगा.

﴿قُلْ يَوْمَ الْفَتْحِ لَا يَنْفَعُ الَّذِينَ كَفَرُوا إِيمَانُهُمْ وَلَا هُمْ يُنْظَرُونَ﴾

२९.
त्यांना उत्तर द्या की फैसल्याच्या दिवशी ईमान राखणे कुप्र (इन्कार) करणाऱ्यांच्या काहीच उपयोगी पडणार नाही आणि ना त्यांना ढील (सवड) दिली जाईल.

﴿فَأَعْرِضْ عَنْهُمْ وَانْتَظِرْ إِنَّهُمْ مُنْتَظِرُونَ﴾

३०. आता तुम्ही त्यांचा विचारही सोडून द्या आणि प्रतीक्षा करीत राहा. हे देखील प्रतीक्षा करीत आहेत.

الترجمات والتفاسير لهذه السورة: