الشمس

تفسير سورة الشمس

الترجمة الماراتية

मराठी

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ وَالشَّمْسِ وَضُحَاهَا﴾

१. शपथ आहे सूर्याची आणि त्याच्या उन्हाची.

﴿وَالْقَمَرِ إِذَا تَلَاهَا﴾

२. शपथ आहे चंद्राची जेव्हा त्याच्या मागे येईल.

﴿وَالنَّهَارِ إِذَا جَلَّاهَا﴾

३. शपथ आहे दिवसाची जेव्हा सूर्याला प्रकट करील.

﴿وَاللَّيْلِ إِذَا يَغْشَاهَا﴾

४. शपथ आहे रात्रीची जेव्हा त्याला झाकून टाकील.

﴿وَالسَّمَاءِ وَمَا بَنَاهَا﴾

५. शपथ आहे आकाशाची आणि त्याला बनविण्याची.

﴿وَالْأَرْضِ وَمَا طَحَاهَا﴾

६. शपथ आहे जमिनीची आणि तिला समतल करण्याची.

﴿وَنَفْسٍ وَمَا سَوَّاهَا﴾

७. शपथ आहे प्राणा (आत्म्या) ची आणि त्याला योग्य बनविण्याची.

﴿فَأَلْهَمَهَا فُجُورَهَا وَتَقْوَاهَا﴾

८. मग समज दिली त्याला दुराचाराची आणि त्यापासून अलिप्त राहण्याची.

﴿قَدْ أَفْلَحَ مَنْ زَكَّاهَا﴾

९. ज्याने या (आत्म्या) ला स्वच्छ शुद्ध केले, तो सफल झाला.

﴿وَقَدْ خَابَ مَنْ دَسَّاهَا﴾

१०. आणि ज्याने याला मातीत मिळवले तो असफल झाला.

﴿كَذَّبَتْ ثَمُودُ بِطَغْوَاهَا﴾

११. समूद जनसमूहाने आपल्या विद्रोहामुळे खोटे ठरविले.

﴿إِذِ انْبَعَثَ أَشْقَاهَا﴾

१२. जेव्हा त्यांच्यातला एक मोठा अभागी उठून उभा राहिला.

﴿فَقَالَ لَهُمْ رَسُولُ اللَّهِ نَاقَةَ اللَّهِ وَسُقْيَاهَا﴾

१३.
त्यांना अल्लाहच्या पैगंबराने फर्माविले होते की सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या सांडणीचे आणि तिच्या पिण्याच्या पाळीचे (रक्षण करा).

﴿فَكَذَّبُوهُ فَعَقَرُوهَا فَدَمْدَمَ عَلَيْهِمْ رَبُّهُمْ بِذَنْبِهِمْ فَسَوَّاهَا﴾

१४. त्या लोकांनी आपल्या पैगंबरांना खोटे जाणून त्या सांडणीला मारून टाकले.
तेव्हा त्यांच्या पालनकर्त्याने त्यांच्या अपराधापायी त्यांना विनाशात टाकले आणि मग विनाशाला सार्वत्रिक केले आणि त्या संपूर्ण वस्तीला भुईसपाट करून टाकले.

﴿وَلَا يَخَافُ عُقْبَاهَا﴾

१५. तो या प्रकोपाच्या परिणामापासून निर्भय आहे.

الترجمات والتفاسير لهذه السورة: