الفتح

تفسير سورة الفتح

الترجمة الماراتية

मराठी

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ إِنَّا فَتَحْنَا لَكَ فَتْحًا مُبِينًا﴾

१. निःसंशय, (हे पैगंबर!) आम्ही तुम्हाला एक खुला विजय प्रदान केला आहे.

﴿لِيَغْفِرَ لَكَ اللَّهُ مَا تَقَدَّمَ مِنْ ذَنْبِكَ وَمَا تَأَخَّرَ وَيُتِمَّ نِعْمَتَهُ عَلَيْكَ وَيَهْدِيَكَ صِرَاطًا مُسْتَقِيمًا﴾

२.
यासाठी की अल्लाहने तुमच्या पुढच्या मागच्या चुका माफ कराव्यात, आणि तुमच्यावर आपली कृपा-देणगी पूर्ण करावी आणि तुम्हाला सरळ मार्गावर चालवावे.

﴿وَيَنْصُرَكَ اللَّهُ نَصْرًا عَزِيزًا﴾

३. आणि तुम्हाला एक भरपूर मदत प्रदान करावी.

﴿هُوَ الَّذِي أَنْزَلَ السَّكِينَةَ فِي قُلُوبِ الْمُؤْمِنِينَ لِيَزْدَادُوا إِيمَانًا مَعَ إِيمَانِهِمْ ۗ وَلِلَّهِ جُنُودُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ ۚ وَكَانَ اللَّهُ عَلِيمًا حَكِيمًا﴾

४.
तोच आहे ज्याने मुसलमानांच्या मनात शांती (आणि आत्मिवश्वास) अवतरित केला, यासाठी की त्यांनी आपल्या ईमानासोबतच आणखी जास्त ईमानात वृद्धिंगत व्हावे. आणि आकाशांची व धरतीची समस्त सैन्ये अल्लाहचीच आहेत, आणि अल्लाह जाणणारा, हिकमतशाली आहे.

﴿لِيُدْخِلَ الْمُؤْمِنِينَ وَالْمُؤْمِنَاتِ جَنَّاتٍ تَجْرِي مِنْ تَحْتِهَا الْأَنْهَارُ خَالِدِينَ فِيهَا وَيُكَفِّرَ عَنْهُمْ سَيِّئَاتِهِمْ ۚ وَكَانَ ذَٰلِكَ عِنْدَ اللَّهِ فَوْزًا عَظِيمًا﴾

५.
यासाठी की मुस्लिम पुरुषांना आणि स्त्रियांना त्या जन्नतींमध्ये दाखल करावे, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत, जिथे ते सदैव काळ राहतील आणि त्यांच्यापासून त्यांची दुष्कर्मे दूर करावीत आणि अल्लाहच्या जवळही फार मोठी सफलता आहे.

﴿وَيُعَذِّبَ الْمُنَافِقِينَ وَالْمُنَافِقَاتِ وَالْمُشْرِكِينَ وَالْمُشْرِكَاتِ الظَّانِّينَ بِاللَّهِ ظَنَّ السَّوْءِ ۚ عَلَيْهِمْ دَائِرَةُ السَّوْءِ ۖ وَغَضِبَ اللَّهُ عَلَيْهِمْ وَلَعَنَهُمْ وَأَعَدَّ لَهُمْ جَهَنَّمَ ۖ وَسَاءَتْ مَصِيرًا﴾

६.
आणि यासाठी की त्या मुनाफिक (दांभिक) पुरुषांना आणि मुनाफिक स्त्रियांना, आणि मूर्तिपूजक पुरुषांना व मूर्तिपूजक स्त्रियांना अज़ाब (शिक्षा) द्यावी, जे अल्लाहविषयी गैरसमज बाळगतात (वस्तुतः) त्याच्यावरच वाईटपणाचे चक्र आहे.
अल्लाह त्यांच्यावर नाराज झाला आणि त्याने त्यांना धिःक्कारले आणि त्यांच्यासाठी जहन्नम तयार केली आणि ते परतीचे मोठे वाईट ठिकाण आहे.

﴿وَلِلَّهِ جُنُودُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ ۚ وَكَانَ اللَّهُ عَزِيزًا حَكِيمًا﴾

७. आणि अल्लाहच्याचकरिता आकाशांची आणि धरतीची सैन्ये आहेत, आणि अल्लाह वर्चस्वशाली, हिकमत बाळगणारा आहे.

﴿إِنَّا أَرْسَلْنَاكَ شَاهِدًا وَمُبَشِّرًا وَنَذِيرًا﴾

८. निःसंशय, आम्ही तुम्हाला साक्ष देणारा आणि शुभ समाचार ऐकविणारा व खबरदार करणारा बनवून पाठविले आहे.

﴿لِتُؤْمِنُوا بِاللَّهِ وَرَسُولِهِ وَتُعَزِّرُوهُ وَتُوَقِّرُوهُ وَتُسَبِّحُوهُ بُكْرَةً وَأَصِيلًا﴾

९.
यासाठी की (हे ईमानधारकांनो!) तुम्ही अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखा आणि त्याला सहाय्य करा व त्याचा आदर राखा, आणि अल्लाहचे पावित्र्य सकाळ-संध्याकाळ वर्णन करा.

﴿إِنَّ الَّذِينَ يُبَايِعُونَكَ إِنَّمَا يُبَايِعُونَ اللَّهَ يَدُ اللَّهِ فَوْقَ أَيْدِيهِمْ ۚ فَمَنْ نَكَثَ فَإِنَّمَا يَنْكُثُ عَلَىٰ نَفْسِهِ ۖ وَمَنْ أَوْفَىٰ بِمَا عَاهَدَ عَلَيْهُ اللَّهَ فَسَيُؤْتِيهِ أَجْرًا عَظِيمًا﴾

१०.
निःसंशय, जे लोक तुमच्याशी बैअत (अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांचे आज्ञापालन व अनुसरण करण्याचा वायदा ताकीदपूर्वक जाहीर करणे) करतात, ते निःसंशय, अल्लाहशीच बैअत करतात.
त्यांच्या हातावर अल्लाहचा हात आहे, तेव्हा जो मनुष्य वचन भंग करील तर तो स्वतःवरच वचन भंग करतो, आणि जो मनुष्य तो वायदा पूर्ण करील, जो त्याने अल्लाहशी केला आहे, तर त्याला लवकरच अल्लाह फार महान मोबदला प्रदान करील.

﴿سَيَقُولُ لَكَ الْمُخَلَّفُونَ مِنَ الْأَعْرَابِ شَغَلَتْنَا أَمْوَالُنَا وَأَهْلُونَا فَاسْتَغْفِرْ لَنَا ۚ يَقُولُونَ بِأَلْسِنَتِهِمْ مَا لَيْسَ فِي قُلُوبِهِمْ ۚ قُلْ فَمَنْ يَمْلِكُ لَكُمْ مِنَ اللَّهِ شَيْئًا إِنْ أَرَادَ بِكُمْ ضَرًّا أَوْ أَرَادَ بِكُمْ نَفْعًا ۚ بَلْ كَانَ اللَّهُ بِمَا تَعْمَلُونَ خَبِيرًا﴾

११.
ग्रामीणांपैकी जे मागे सोडून दिले गेले होते, ते आता तुम्हाला निश्चित म्हणतील की आम्ही आपल्या धन-संपत्ती व संततीतच व्यस्त राहिलो, तेव्हा तुम्ही आमच्यासाठी माफीची दुआ-प्रार्थना करा. हे लोक आपल्या तोंडांनी ते बोलतात, जे त्यांच्या मनात नाही.
तुम्ही उत्तर द्या की तुमच्यासाठी अल्लाहतर्फे एखाद्या गोष्टीचाही अधिकार कोण बाळगतो, जर तो तुम्हाला नुकसान पोहचवू इच्छिल किंवा तुम्हाला काही लाभ पोहचवू इच्छिल? किंबहुना तुम्ही जे काही करीत आहात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.

﴿بَلْ ظَنَنْتُمْ أَنْ لَنْ يَنْقَلِبَ الرَّسُولُ وَالْمُؤْمِنُونَ إِلَىٰ أَهْلِيهِمْ أَبَدًا وَزُيِّنَ ذَٰلِكَ فِي قُلُوبِكُمْ وَظَنَنْتُمْ ظَنَّ السَّوْءِ وَكُنْتُمْ قَوْمًا بُورًا﴾

१२.
(नव्हे) किंबहुना तुम्ही तर असे गृहीत धरले होते की पैगंबर आणि मुसलमानांचे आपल्या घरांकडे परतणे अगदी अशक्य आहे आणि हाच विचार तुमच्या मनांमध्ये रुजला, तुम्ही दुराग्रह बाळगला होता (वास्तविक) तुम्ही लोक आहातच नष्ट होणारे.

﴿وَمَنْ لَمْ يُؤْمِنْ بِاللَّهِ وَرَسُولِهِ فَإِنَّا أَعْتَدْنَا لِلْكَافِرِينَ سَعِيرًا﴾

१३.
आणि जो मनुष्य अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखणारे नाही तर आम्ही देखील अशा काफिरांकरिता धगधगणारी आग तयार करून ठेवली आहे.

﴿وَلِلَّهِ مُلْكُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ ۚ يَغْفِرُ لِمَنْ يَشَاءُ وَيُعَذِّبُ مَنْ يَشَاءُ ۚ وَكَانَ اللَّهُ غَفُورًا رَحِيمًا﴾

१४.
आणि आकाशांची व धरतीची राज्य-सत्ता अल्लाहकरिताच आहे तो ज्याला इच्छिल माफ करील आणि ज्याला इच्छिल अज़ाब (शिक्षा) देईल आणि अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे.

﴿سَيَقُولُ الْمُخَلَّفُونَ إِذَا انْطَلَقْتُمْ إِلَىٰ مَغَانِمَ لِتَأْخُذُوهَا ذَرُونَا نَتَّبِعْكُمْ ۖ يُرِيدُونَ أَنْ يُبَدِّلُوا كَلَامَ اللَّهِ ۚ قُلْ لَنْ تَتَّبِعُونَا كَذَٰلِكُمْ قَالَ اللَّهُ مِنْ قَبْلُ ۖ فَسَيَقُولُونَ بَلْ تَحْسُدُونَنَا ۚ بَلْ كَانُوا لَا يَفْقَهُونَ إِلَّا قَلِيلًا﴾

१५.
जेव्हा तुम्ही (युद्धात हाती लागलेला) परिहार घेण्यास जाऊ लागला, तेव्हा त्वरित हे मागे सोडलेले लोक म्हणतील की आम्हालाही आपल्या सोबत येण्याची आज्ञा द्या.
ते असे इच्छितात की अल्लाहचे कथन बदलून टाकावे (तुम्ही त्यांना) सांगा की, अल्लाहने या आधीच सांगून टाकले आहे की तुम्ही कधीही आमचे अनुसरण न कराल तेव्हा ते यावर उत्तर देतील की (नाही, नाही) किंबहुना तुम्हीच आमचा मत्सर करता. (खरी गोष्ट अशी की) हे लोक फार कमी समजतात.

﴿قُلْ لِلْمُخَلَّفِينَ مِنَ الْأَعْرَابِ سَتُدْعَوْنَ إِلَىٰ قَوْمٍ أُولِي بَأْسٍ شَدِيدٍ تُقَاتِلُونَهُمْ أَوْ يُسْلِمُونَ ۖ فَإِنْ تُطِيعُوا يُؤْتِكُمُ اللَّهُ أَجْرًا حَسَنًا ۖ وَإِنْ تَتَوَلَّوْا كَمَا تَوَلَّيْتُمْ مِنْ قَبْلُ يُعَذِّبْكُمْ عَذَابًا أَلِيمًا﴾

१६.
(तुम्ही) मागे सोडलेल्या ग्रामीण लोकांना सांगा की लवकरच तुम्ही एका मोठ्या शूरवीर जनसमूहाकडे बोलाविले जाल, की तुम्ही त्याच्याशी युद्ध कराल किंवा ते ईमानधारक होतील.
तेव्हा जर तुम्ही आज्ञापालन कराल, तर अल्लाह तुम्हाला फार चांगला मोबदला प्रदान करील आणि जर तुम्ही तोंड फिरविले, जसे की तुम्ही यापूर्वी तोंड फिरवून घेतले आहे, तर तो तुम्हाला दुःखदायक शिक्षा यातना देईल.

﴿لَيْسَ عَلَى الْأَعْمَىٰ حَرَجٌ وَلَا عَلَى الْأَعْرَجِ حَرَجٌ وَلَا عَلَى الْمَرِيضِ حَرَجٌ ۗ وَمَنْ يُطِعِ اللَّهَ وَرَسُولَهُ يُدْخِلْهُ جَنَّاتٍ تَجْرِي مِنْ تَحْتِهَا الْأَنْهَارُ ۖ وَمَنْ يَتَوَلَّ يُعَذِّبْهُ عَذَابًا أَلِيمًا﴾

१७.
आंधळ्यावर कसलाही अपराध नाही, ना पांगळ्यावर काही अपराध आहे आणि ना आजारी माणसावर काही अपराध आहे आणि जो कोणी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचे आदेशाचे पालन करील, त्याला अल्लाह अशा जन्नतमध्ये दाखल करील, जिच्या खाली प्रवाह वाहत आहेत आणि जो तोंड फिरविल, त्याला तो दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातना) देईल.

﴿۞ لَقَدْ رَضِيَ اللَّهُ عَنِ الْمُؤْمِنِينَ إِذْ يُبَايِعُونَكَ تَحْتَ الشَّجَرَةِ فَعَلِمَ مَا فِي قُلُوبِهِمْ فَأَنْزَلَ السَّكِينَةَ عَلَيْهِمْ وَأَثَابَهُمْ فَتْحًا قَرِيبًا﴾

१८. निःसंशय, अल्लाह ईमान राखणाऱ्यांशी प्रसन्न झाला, जेव्हा ते झाडाखाली तुमच्याशी बैअत (प्रतिज्ञा) करीत होते.
त्याच्या मनात जे काही होते, ते त्याने माहीत करून घेतले आणि त्याच्यावर शांती अवतरित केली आणि त्यांना निकटचा विजय प्रदान केला.

﴿وَمَغَانِمَ كَثِيرَةً يَأْخُذُونَهَا ۗ وَكَانَ اللَّهُ عَزِيزًا حَكِيمًا﴾

१९. आणि युद्धात जिंकलेला अनेक प्रकारचा माल, जो ते प्राप्त करतील आणि अल्लाह वर्चस्वशाली, हिकमत बाळगणारा आहे.

﴿وَعَدَكُمُ اللَّهُ مَغَانِمَ كَثِيرَةً تَأْخُذُونَهَا فَعَجَّلَ لَكُمْ هَٰذِهِ وَكَفَّ أَيْدِيَ النَّاسِ عَنْكُمْ وَلِتَكُونَ آيَةً لِلْمُؤْمِنِينَ وَيَهْدِيَكُمْ صِرَاطًا مُسْتَقِيمًا﴾

२०.
अल्लाहने तुमच्याशी खूप जास्त युद्धात जिंकलेल्या मालाचा वायदा केला आहे, जो तुम्ही प्राप्त कराल आणि हे तर तुम्हाला त्वरित प्रदान केले, आणि लोकांचे हात तुमच्यापासून रोखले, यासाठी की ईमान राखणाऱ्यांकरिता ही एक निशाणी ठरावी, आणि यासाठी की त्याने तुम्हाला सरळ मार्गावर चालवावे.

﴿وَأُخْرَىٰ لَمْ تَقْدِرُوا عَلَيْهَا قَدْ أَحَاطَ اللَّهُ بِهَا ۚ وَكَانَ اللَّهُ عَلَىٰ كُلِّ شَيْءٍ قَدِيرًا﴾

२१.
आणि (तो) तुम्हाला इतर गनीमती (युद्धात हाती लागलेला माल) देखील देईल, ज्यांच्यावर तुम्ही अजून काबू मिळविला नाही अल्लाहने त्यांना काबूत ठेवले आहे आणि अल्लाह प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे.

﴿وَلَوْ قَاتَلَكُمُ الَّذِينَ كَفَرُوا لَوَلَّوُا الْأَدْبَارَ ثُمَّ لَا يَجِدُونَ وَلِيًّا وَلَا نَصِيرًا﴾

२२. आणि जर तुमच्याशी काफिरांनी लढाई केली असती तर निःसंशय ते पाठ दाखवून पळाले असते. मग ना त्यांना कोणी कार्यसाधक आढळला असता, ना कोणी मदत करणारा.

﴿سُنَّةَ اللَّهِ الَّتِي قَدْ خَلَتْ مِنْ قَبْلُ ۖ وَلَنْ تَجِدَ لِسُنَّةِ اللَّهِ تَبْدِيلًا﴾

२३.
अल्लाहच्या त्या नियमानुसार जो पहिल्यापासून चालत आला आहे आणि तुम्हाला अल्लाहच्या नियमात कधीही बदल झालेला आढळत नाही.

﴿وَهُوَ الَّذِي كَفَّ أَيْدِيَهُمْ عَنْكُمْ وَأَيْدِيَكُمْ عَنْهُمْ بِبَطْنِ مَكَّةَ مِنْ بَعْدِ أَنْ أَظْفَرَكُمْ عَلَيْهِمْ ۚ وَكَانَ اللَّهُ بِمَا تَعْمَلُونَ بَصِيرًا﴾

२४.
तोच आहे, ज्याने खास मक्का येथे काफिरांच्या हातांना तुमच्यापासून आणि तुमच्या हातांना त्यांच्यापासून रोखले. यानंतर की त्याने तुम्हाला त्यांच्यावर विजयी केले, आणि तुम्ही जे काही करीत आहात अल्लाह ते सर्व पाहत आहे.

﴿هُمُ الَّذِينَ كَفَرُوا وَصَدُّوكُمْ عَنِ الْمَسْجِدِ الْحَرَامِ وَالْهَدْيَ مَعْكُوفًا أَنْ يَبْلُغَ مَحِلَّهُ ۚ وَلَوْلَا رِجَالٌ مُؤْمِنُونَ وَنِسَاءٌ مُؤْمِنَاتٌ لَمْ تَعْلَمُوهُمْ أَنْ تَطَئُوهُمْ فَتُصِيبَكُمْ مِنْهُمْ مَعَرَّةٌ بِغَيْرِ عِلْمٍ ۖ لِيُدْخِلَ اللَّهُ فِي رَحْمَتِهِ مَنْ يَشَاءُ ۚ لَوْ تَزَيَّلُوا لَعَذَّبْنَا الَّذِينَ كَفَرُوا مِنْهُمْ عَذَابًا أَلِيمًا﴾

२५.
हेच ते लोक होत, ज्यांनी कुप्र (इन्कार) केला आणि तुम्हाला मस्जिदेे हराम (काबागृहा) पासून रोखले आणि कुर्बानीसाठी थांबलेल्या जनावरांना त्याच्या ठिकाणापर्यंत पोहचण्यापासून (रोखले) आणि जर असे (अनेक) मुस्लिम पुरुष आणि (अनेक) मुस्लिम स्त्रिया नसत्या, ज्यांची तुम्हाला खबर नव्हती की तुम्ही त्यांना (अजाणतेपणी) चिरडून टाकाल, ज्याबद्दल त्यांच्यामुळे तुम्हालाही नकळत हानि पोहचली असती (तर तुम्हाला लढण्याची अनुमती दिली गेली असती, परंतु असे केले गेले नाही) यासाठी की अल्लाहने आपल्या दया कृपेत, ज्याला इच्छिल त्याला दाखल करावे, आणि जर ते वेगवेगळे राहिले असते, तर त्यांच्यात जे काफिर होते, आम्ही त्यांना दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातना) दिला असता.

﴿إِذْ جَعَلَ الَّذِينَ كَفَرُوا فِي قُلُوبِهِمُ الْحَمِيَّةَ حَمِيَّةَ الْجَاهِلِيَّةِ فَأَنْزَلَ اللَّهُ سَكِينَتَهُ عَلَىٰ رَسُولِهِ وَعَلَى الْمُؤْمِنِينَ وَأَلْزَمَهُمْ كَلِمَةَ التَّقْوَىٰ وَكَانُوا أَحَقَّ بِهَا وَأَهْلَهَا ۚ وَكَانَ اللَّهُ بِكُلِّ شَيْءٍ عَلِيمًا﴾

२६.
जेव्हा त्या काफिरांनी आपल्या मनात पक्षपात भावनेला स्थान दिले, आणि पक्षपातही अडाणीपणाचा, तेव्हा अल्लाहने आपल्या पैगंबरावर आणि ईमान राखणाऱ्यांवर आपल्यातर्फे शांती अवतरित केली, आणि ईमान राखणाऱ्यांना ईशभया (तकवा) च्या गोष्टीवर दृढराखले१ आणि ते या गोष्टीस पात्र आणि जास्त हक्कदार होते आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीस चांगल्या प्रकारे जाणतो.

﴿لَقَدْ صَدَقَ اللَّهُ رَسُولَهُ الرُّؤْيَا بِالْحَقِّ ۖ لَتَدْخُلُنَّ الْمَسْجِدَ الْحَرَامَ إِنْ شَاءَ اللَّهُ آمِنِينَ مُحَلِّقِينَ رُءُوسَكُمْ وَمُقَصِّرِينَ لَا تَخَافُونَ ۖ فَعَلِمَ مَا لَمْ تَعْلَمُوا فَجَعَلَ مِنْ دُونِ ذَٰلِكَ فَتْحًا قَرِيبًا﴾

२७.
वस्तुतः अल्लाहने आपल्या पैगंबराला, खरे स्वप्न दाखविले की जर अल्लाहने इच्छिले तर तुम्ही अवश्य शांती-सुरक्षापूर्वक मस्जिदेे हराममध्ये दाखल व्हाल, डोके मुंडवित आणि डोक्याचे केस कापवून घेत अगदी निर्भय होऊन. तो त्या गोष्टी जाणतो, ज्या तुम्ही जाणत नाहीत, तेव्हा त्याने तुम्हाला यापूर्वी एक निकटचा विजय प्रदान केला.

﴿هُوَ الَّذِي أَرْسَلَ رَسُولَهُ بِالْهُدَىٰ وَدِينِ الْحَقِّ لِيُظْهِرَهُ عَلَى الدِّينِ كُلِّهِ ۚ وَكَفَىٰ بِاللَّهِ شَهِيدًا﴾

२८.
तोच होय, ज्याने आपल्या पैगंबराला मार्गदर्शन आणि सत्य धर्मासह पाठविले, यासाठी की त्याला प्रत्येक धर्मावर वर्चस्वशाली करावे, आणि साक्ष देण्यासाठी अल्लाह पुरेसा आहे.

﴿مُحَمَّدٌ رَسُولُ اللَّهِ ۚ وَالَّذِينَ مَعَهُ أَشِدَّاءُ عَلَى الْكُفَّارِ رُحَمَاءُ بَيْنَهُمْ ۖ تَرَاهُمْ رُكَّعًا سُجَّدًا يَبْتَغُونَ فَضْلًا مِنَ اللَّهِ وَرِضْوَانًا ۖ سِيمَاهُمْ فِي وُجُوهِهِمْ مِنْ أَثَرِ السُّجُودِ ۚ ذَٰلِكَ مَثَلُهُمْ فِي التَّوْرَاةِ ۚ وَمَثَلُهُمْ فِي الْإِنْجِيلِ كَزَرْعٍ أَخْرَجَ شَطْأَهُ فَآزَرَهُ فَاسْتَغْلَظَ فَاسْتَوَىٰ عَلَىٰ سُوقِهِ يُعْجِبُ الزُّرَّاعَ لِيَغِيظَ بِهِمُ الْكُفَّارَ ۗ وَعَدَ اللَّهُ الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ مِنْهُمْ مَغْفِرَةً وَأَجْرًا عَظِيمًا﴾

२९.
मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) अल्लाहचे रसूल (पैगंबर) आहेत आणि जे लोक त्यांच्यासोबत आहेत, ते काफिरांवर कठोर आहेत. आपसात दयाशील आहेत. तुम्ही त्यांना पाहाल की रुकूअ व सजदे करीत आहेत. अल्लाहची कृपा व त्याच्या प्रसन्नतेची कामना करण्यात (मग्न) आहेत. त्यांचे निशाण त्याच्या चेहऱ्यांवर सजद्यांच्या प्रभावाने आहे.
त्यांचा हाच गुणविशेष (उदाहरण) तौरातमध्ये आहे आणि त्यांचे उदाहरण इंजीलमध्ये आहे, त्या शेतीसारखे, जिने आपले अंकूर बाहेर काढले, मग त्याला मजबूती दिली आणि ते जाड झाले, मग आपल्या खोडावर सरळ उभे राहिले आणि शेतकऱ्यांना आनंदित करू लागले, यासाठी की त्यांच्यामुळे काफिरांना चिडवावे, आणि ईमान राखणाऱ्यांशी व नेक सदाचारी लोकांशी अल्लाहने माफीचा आणि फार मोठ्या मोबदल्याचा वायदा केला आहे.

الترجمات والتفاسير لهذه السورة: