الرحيم
كلمة (الرحيم) في اللغة صيغة مبالغة من الرحمة على وزن (فعيل) وهي...
९१. आणि त्यांनी, अल्लाहची जशी कदर केली पाहिजे होती तशी कदर केली नाही. जेव्हा ते असे म्हणाले की अल्लाहने कोणा माणसावर काही उतरविले नाही.
तुम्ही सांगा, मूसा जो ग्रंथ तुमच्याजवळ घेऊन आले, जो लोकांकरिता दिव्य प्रकाश आणि मार्गदर्शन आहे, तो कोणी उतरविला, ज्याला तुम्ही वेगवेगळ्या पानांमध्ये ठेवता, ज्यातून काही जाहीर करता आणि अधिकांश लपविता आणि तुम्हाला ते ज्ञान दिले गेले, जे तुम्ही आणि तुमचे वाडवडील जाणत नव्हते. तुम्ही सांगा की अल्लाहनेच उतरविला होता. मग त्यांना त्यांच्या दोष काढण्यात, खेळ तमाशा करीत सोडून द्या.