المتين
كلمة (المتين) في اللغة صفة مشبهة باسم الفاعل على وزن (فعيل) وهو...
९३.
आणि त्याहून मोठा अत्याचारी आणखी कोण असू शकतो, जो अल्लाहवर खोटा आरोप ठेवील किंवा असे म्हणेल की माझ्याकडे वहयी आली आहे, वास्तविक त्याच्याकडे काहीच आले नाही आणि जो असे म्हणाला की, ज्याप्रकारे अल्लाहने उतरविले तसे मीदेखील उतरविन. जर तुम्ही अत्याचारींना मृत्युच्या कठोर शिक्षा-यातनेत पाहाल, जेव्हा फरिश्ते आपले हात पुढे करून म्हणतील, आपला जीव काढा. आज तुम्हाला अल्लाहवर नाहक आरोप ठेवण्यामुळे आणि घमेंडीने त्याच्या आयतींचा इन्कार करण्यापायी अपमानदायक मोबदला दिला जाईल.