البحث

عبارات مقترحة:

النصير

كلمة (النصير) في اللغة (فعيل) بمعنى (فاعل) أي الناصر، ومعناه العون...

الرقيب

كلمة (الرقيب) في اللغة صفة مشبهة على وزن (فعيل) بمعنى (فاعل) أي:...

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

1- ﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ الم﴾


१. अलिफ. लाम. मीम

2- ﴿غُلِبَتِ الرُّومُ﴾


२. रोमन पराजित झाले.

3- ﴿فِي أَدْنَى الْأَرْضِ وَهُمْ مِنْ بَعْدِ غَلَبِهِمْ سَيَغْلِبُونَ﴾


३. जवळच्या प्रदेशात आणि ते पराजित झाल्यानंतर भविष्यात वर्चस्वशाली होतील.

4- ﴿فِي بِضْعِ سِنِينَ ۗ لِلَّهِ الْأَمْرُ مِنْ قَبْلُ وَمِنْ بَعْدُ ۚ وَيَوْمَئِذٍ يَفْرَحُ الْمُؤْمِنُونَ﴾


४. काही वर्षांच्या आतच, याच्यापूर्वी आणि यानंतरही अधिकार फक्त अल्लाहचाच आहे, आणि त्या दिवशी ईमान राखणारे खूश होतील.

5- ﴿بِنَصْرِ اللَّهِ ۚ يَنْصُرُ مَنْ يَشَاءُ ۖ وَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ﴾


५. अल्लाहच्या मदतीने तो ज्याला इच्छितो मदत करतो, आणि खरा विजेता आणि वर्चस्वशाली आणि दयावान तोच आहे.

6- ﴿وَعْدَ اللَّهِ ۖ لَا يُخْلِفُ اللَّهُ وَعْدَهُ وَلَٰكِنَّ أَكْثَرَ النَّاسِ لَا يَعْلَمُونَ﴾


६. अल्लाहचा वायदा आहे. अल्लाह आपल्या वायद्यांचा भंग करीत नाही, परंतु बहुतेक लोक जाणत नाहीत.

7- ﴿يَعْلَمُونَ ظَاهِرًا مِنَ الْحَيَاةِ الدُّنْيَا وَهُمْ عَنِ الْآخِرَةِ هُمْ غَافِلُونَ﴾


७. ते तर (फक्त) ऐहिक जीवनाच्या बाह्य स्वरूपालाच जाणतात. आणि आखिरतपासून तर अगदी गाफील आहेत.

8- ﴿أَوَلَمْ يَتَفَكَّرُوا فِي أَنْفُسِهِمْ ۗ مَا خَلَقَ اللَّهُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ وَمَا بَيْنَهُمَا إِلَّا بِالْحَقِّ وَأَجَلٍ مُسَمًّى ۗ وَإِنَّ كَثِيرًا مِنَ النَّاسِ بِلِقَاءِ رَبِّهِمْ لَكَافِرُونَ﴾


८.
काय त्या लोकांनी आपल्या मनात यावर विचार नाही केला की अल्लाह ने आकाशांना व जमिनीला आणि त्यांच्या दरम्यान जे काही आहे त्या सर्वांना उत्तम अनुमानाने,१ निर्धारित वेळेपर्यंत (च) निर्माण केले आहे, तथापि अधिकांश लोक आपल्या पालनकर्त्याच्या भेटीचा इन्कार करतात.

9- ﴿أَوَلَمْ يَسِيرُوا فِي الْأَرْضِ فَيَنْظُرُوا كَيْفَ كَانَ عَاقِبَةُ الَّذِينَ مِنْ قَبْلِهِمْ ۚ كَانُوا أَشَدَّ مِنْهُمْ قُوَّةً وَأَثَارُوا الْأَرْضَ وَعَمَرُوهَا أَكْثَرَ مِمَّا عَمَرُوهَا وَجَاءَتْهُمْ رُسُلُهُمْ بِالْبَيِّنَاتِ ۖ فَمَا كَانَ اللَّهُ لِيَظْلِمَهُمْ وَلَٰكِنْ كَانُوا أَنْفُسَهُمْ يَظْلِمُونَ﴾


९.
काय त्यांनी जमिनीवर हिंडून फिरून पाहिले नाही की त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांचा परिणाम (अंत) कसा (वाईट) झाला? ते यांच्यापेक्षा जास्त शक्तिशाली होते आणि त्यांनी देखील जमीन पेरली-नांगरली होती आणि यांच्यापेक्षा जास्त आबादी केली होती. आणि त्यांच्याजवळ त्यांचे रसूल (पैगंबर) ईश-चमत्कार (मोजिजे) घेऊन आले होते. हे तर अशक्य होते की अल्लाहने त्यांच्यावर जुलूम अत्याचार केला असता. परंतु (खरे पाहता) ते स्वतः आपल्या प्राणांवर अत्याचार करीत होते.

10- ﴿ثُمَّ كَانَ عَاقِبَةَ الَّذِينَ أَسَاءُوا السُّوأَىٰ أَنْ كَذَّبُوا بِآيَاتِ اللَّهِ وَكَانُوا بِهَا يَسْتَهْزِئُونَ﴾


१०. मग शेवटी वाईट लोकांची परिणीती वाईट झाली, यासाठी की ते अल्लाहच्या आयतींना खोटे ठरवीत आणि त्यांची थट्टा उडवीत.

11- ﴿اللَّهُ يَبْدَأُ الْخَلْقَ ثُمَّ يُعِيدُهُ ثُمَّ إِلَيْهِ تُرْجَعُونَ﴾


११. अल्लाहच सृष्टी-निर्मितीचा आरंभ करतो, मग तोच तिला दुसऱ्यांदा निर्माण करील, मग तुम्ही सर्व त्याच्याचकडे परतविले जाल.

12- ﴿وَيَوْمَ تَقُومُ السَّاعَةُ يُبْلِسُ الْمُجْرِمُونَ﴾


१२. आणि ज्या दिवशी कयामत प्रस्थापित होईल, त्या दिवशी अपराधी आश्चर्यचकित होतील.

13- ﴿وَلَمْ يَكُنْ لَهُمْ مِنْ شُرَكَائِهِمْ شُفَعَاءُ وَكَانُوا بِشُرَكَائِهِمْ كَافِرِينَ﴾


१३. आणि त्यांनी ठरविलेल्या सर्व सहभाग्यांपैकी एकही त्यांची शिफारस करणार नाही.१ आणि स्वतः हेदेखील आपल्या आराध्य दैवतांचा (सहभागी ईश्वरांचा) इन्कार करतील.

14- ﴿وَيَوْمَ تَقُومُ السَّاعَةُ يَوْمَئِذٍ يَتَفَرَّقُونَ﴾


१४. आणि ज्या दिवशी कयामत प्रस्थापित होईल, त्या दिवशी (सर्व समूह) विभागले जातील.

15- ﴿فَأَمَّا الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ فَهُمْ فِي رَوْضَةٍ يُحْبَرُونَ﴾


१५. मग जे ईमान बाळगून सत्कर्म करीत राहतील, त्यांना जन्नतमध्ये खूश केले जाईल.

16- ﴿وَأَمَّا الَّذِينَ كَفَرُوا وَكَذَّبُوا بِآيَاتِنَا وَلِقَاءِ الْآخِرَةِ فَأُولَٰئِكَ فِي الْعَذَابِ مُحْضَرُونَ﴾


१६. आणि ज्यांनी (कुप्र) इन्कार केला होता, आणि आमच्या आयतींना व आखिरतच्या भेटीला खोटे ठरविले होते, त्या सर्वांना शिक्षा - यातनाग्रस्त करून हजर केले जाईल.

17- ﴿فَسُبْحَانَ اللَّهِ حِينَ تُمْسُونَ وَحِينَ تُصْبِحُونَ﴾


१७. तेव्हा अल्लाहची स्तुती-प्रशंसा करीत राहा, जेव्हा तुम्ही संध्याकाळ कराल आणि जेव्हा सकाळ कराल.

18- ﴿وَلَهُ الْحَمْدُ فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَعَشِيًّا وَحِينَ تُظْهِرُونَ﴾


१८. आणि सर्व स्तुती- प्रशंसेस योग्य, आकाशात व जमिनीवर तोच आहे तिसऱ्या प्रहरी आणि दुपारच्या वेळीही त्याची पवित्रता वर्णन करा.

19- ﴿يُخْرِجُ الْحَيَّ مِنَ الْمَيِّتِ وَيُخْرِجُ الْمَيِّتَ مِنَ الْحَيِّ وَيُحْيِي الْأَرْضَ بَعْدَ مَوْتِهَا ۚ وَكَذَٰلِكَ تُخْرَجُونَ﴾


१९. तोच जिविताला मेलेल्यातून बाहेर काढतो आणि मेलेल्यास, जिवितातून बाहेर काढतो, आणि तोच जमिनीला तिच्या मृत्यूनंतर जिवंत करतो. अशाच प्रकारे तुम्ही (देखील) बाहेर काढले जाल.

20- ﴿وَمِنْ آيَاتِهِ أَنْ خَلَقَكُمْ مِنْ تُرَابٍ ثُمَّ إِذَا أَنْتُمْ بَشَرٌ تَنْتَشِرُونَ﴾


२०. आणि अल्लाहच्या निशाण्यांपैकी आहे की तुम्हाला मातीपासून निर्माण केले, मग आता मनुष्य बनून (चालत फिरत) पसरत आहात.

21- ﴿وَمِنْ آيَاتِهِ أَنْ خَلَقَ لَكُمْ مِنْ أَنْفُسِكُمْ أَزْوَاجًا لِتَسْكُنُوا إِلَيْهَا وَجَعَلَ بَيْنَكُمْ مَوَدَّةً وَرَحْمَةً ۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَاتٍ لِقَوْمٍ يَتَفَكَّرُونَ﴾


२१. आणि त्याच्या निशाण्यांपैकी आहे की तुमच्याच (मानव) जातीमधून पत्न्या निर्माण केल्या, यासाठी की तुम्ही त्यांच्यापासून सुख शांती प्राप्त करावी. त्याने तुमच्या दरम्यान प्रेम आणि करुणा निर्माण केली. निःसंशय, विचार चिंतन करणाऱ्यांकरिता यात अनेक निशाण्या आहेत.

22- ﴿وَمِنْ آيَاتِهِ خَلْقُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَاخْتِلَافُ أَلْسِنَتِكُمْ وَأَلْوَانِكُمْ ۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَاتٍ لِلْعَالِمِينَ﴾


२२. आणि त्याच्या सामर्थ्याच्या निशाण्यांपैकी आकाशांची व जमिनीची निर्मिती, आणि तुमच्या भाषा आणि वर्णांची विभिन्नता (देखील) होय. बुद्धिमानांकरिता निश्चितच यात मोठ्या निशाण्या आहेत.

23- ﴿وَمِنْ آيَاتِهِ مَنَامُكُمْ بِاللَّيْلِ وَالنَّهَارِ وَابْتِغَاؤُكُمْ مِنْ فَضْلِهِ ۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَاتٍ لِقَوْمٍ يَسْمَعُونَ﴾


२३. आणि त्याच्या सामर्थ्याचा निशाण्यांपैकी तुमच्या रात्र आणि दिवसाच्या झोपेत आहे आणि त्याच्या कृपेला (अर्थात आजिविकेला) तुमचे शोधणे (ही) आहे. जे लोक कान लावून (लक्षपूर्वक) ऐकणारे आहेत, त्यांच्यासाठी यात मोठ्या निशाण्या आहेत.

24- ﴿وَمِنْ آيَاتِهِ يُرِيكُمُ الْبَرْقَ خَوْفًا وَطَمَعًا وَيُنَزِّلُ مِنَ السَّمَاءِ مَاءً فَيُحْيِي بِهِ الْأَرْضَ بَعْدَ مَوْتِهَا ۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَاتٍ لِقَوْمٍ يَعْقِلُونَ﴾


२४.
आणि त्याच्या निशाण्यांपैकी एक निशाणी ही देखील आहे की तो तुम्हाला भयभीत व आशावान बनविण्याकरिता विजेची चमक दाखवितो, आणि आकाशातून पाणी वर्षवितो आणि त्याद्वारे मृत जमिनीला जिवंत करतो. यात देखील बुद्धिमान लोकांकरिता मोठ्या निशाण्या आहेत.

25- ﴿وَمِنْ آيَاتِهِ أَنْ تَقُومَ السَّمَاءُ وَالْأَرْضُ بِأَمْرِهِ ۚ ثُمَّ إِذَا دَعَاكُمْ دَعْوَةً مِنَ الْأَرْضِ إِذَا أَنْتُمْ تَخْرُجُونَ﴾


२५.
आणि त्याची एक निशाणी ही देखील आहे की आकाश आणि धरती त्याच्या आदेशाने कायम आहेत, मग जेव्हा तो तुम्हाला हाक मारेल, केवळ एक वेळच्या पुकारण्यानेच तुम्ही सर्व जमिनीतून बाहेर पडाल.

26- ﴿وَلَهُ مَنْ فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ ۖ كُلٌّ لَهُ قَانِتُونَ﴾


२६. आणि आकाश व धरतीच्या समस्त वस्तूंचा तोच स्वामी (मालक) आहे आणि सर्वच्या सर्व त्याच्या हुकुमाच्या अधीन आहेत.

27- ﴿وَهُوَ الَّذِي يَبْدَأُ الْخَلْقَ ثُمَّ يُعِيدُهُ وَهُوَ أَهْوَنُ عَلَيْهِ ۚ وَلَهُ الْمَثَلُ الْأَعْلَىٰ فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ ۚ وَهُوَ الْعَزِيزُ الْحَكِيمُ﴾


२७. आणि तोच आहे जो पहिल्यांदा सृष्टी निर्माण करतो, तोच पुन्हा दुसऱ्यांदा निर्माण करील आणि हे त्याच्याकरिता फारच सोपे आहे. त्याचीच उत्तम आणि उच्च गुणविशेषता आहे१ आकाशांमध्ये आणि धरतीतही. तो मोठा जबरदस्त बुद्धिकौशल्य (हिकमत) बाळगणारा आहे.

28- ﴿ضَرَبَ لَكُمْ مَثَلًا مِنْ أَنْفُسِكُمْ ۖ هَلْ لَكُمْ مِنْ مَا مَلَكَتْ أَيْمَانُكُمْ مِنْ شُرَكَاءَ فِي مَا رَزَقْنَاكُمْ فَأَنْتُمْ فِيهِ سَوَاءٌ تَخَافُونَهُمْ كَخِيفَتِكُمْ أَنْفُسَكُمْ ۚ كَذَٰلِكَ نُفَصِّلُ الْآيَاتِ لِقَوْمٍ يَعْقِلُونَ﴾


२८. अल्लाहने एक उदाहरण स्वतः तुमचेच सांगितले.
जे काही आम्ही तुम्हाला प्रदान केले आहे, काय त्यात तुमच्या दासांपैकी कोणी तुमचा भागीदार आहे की तुम्ही आणि तो यात समान पदाचे असावेत? १ आणि तुम्ही त्याचे भय अशा प्रकारे राखता, जसे स्वतः आपल्या लोकांचे? आम्ही बुद्धिमानांकरिता अशाच प्रकारे स्पष्टतः आयती निवेदन करतो.

29- ﴿بَلِ اتَّبَعَ الَّذِينَ ظَلَمُوا أَهْوَاءَهُمْ بِغَيْرِ عِلْمٍ ۖ فَمَنْ يَهْدِي مَنْ أَضَلَّ اللَّهُ ۖ وَمَا لَهُمْ مِنْ نَاصِرِينَ﴾


२९.
खरी गोष्ट अशी की हे अत्याचारी ज्ञानाविना इच्छा-आकांक्षांचे भक्त आहेत, त्याला कोण मार्ग दाखविल ज्याला अल्लाह पथभ्रष्ट करील? त्यांना कोणी एकही मदत करणारा नाही.

30- ﴿فَأَقِمْ وَجْهَكَ لِلدِّينِ حَنِيفًا ۚ فِطْرَتَ اللَّهِ الَّتِي فَطَرَ النَّاسَ عَلَيْهَا ۚ لَا تَبْدِيلَ لِخَلْقِ اللَّهِ ۚ ذَٰلِكَ الدِّينُ الْقَيِّمُ وَلَٰكِنَّ أَكْثَرَ النَّاسِ لَا يَعْلَمُونَ﴾


३०. तेव्हा तुम्ही एकाग्रचित्त होऊन आपला चेहरा दीन (धर्मा) कडे केंद्रित करा. अल्लाहचा तो स्वाभाविक (धर्म) ज्यावर त्याने लोकांना निर्माण केले आहे. अल्लाहच्या रचनेत परिवर्तन नाही. हाच खरा दीन (धर्म) आहे. परंतु अधिकांश लोक समजत नाहीत.

31- ﴿۞ مُنِيبِينَ إِلَيْهِ وَاتَّقُوهُ وَأَقِيمُوا الصَّلَاةَ وَلَا تَكُونُوا مِنَ الْمُشْرِكِينَ﴾


३१. (लोकांनो!) अल्लाहकडे आकर्षित होऊन त्याचे भय बाळगत राहा आणि नमाज कायम राखा आणि अनेक ईश्वरांची भक्ती करणाऱ्यांपैकी होऊ नका.

32- ﴿مِنَ الَّذِينَ فَرَّقُوا دِينَهُمْ وَكَانُوا شِيَعًا ۖ كُلُّ حِزْبٍ بِمَا لَدَيْهِمْ فَرِحُونَ﴾


३२. त्या लोकांपैकी ज्यांनी आपल्या दीन (धर्मा) ला क्षत-विक्षत करून टाकले आणि स्वतःही समूहा-समूहात विभाजित झाले. प्रत्येक समूह आपल्याजवळ जे आहे, त्यातच मग्न आहे.

33- ﴿وَإِذَا مَسَّ النَّاسَ ضُرٌّ دَعَوْا رَبَّهُمْ مُنِيبِينَ إِلَيْهِ ثُمَّ إِذَا أَذَاقَهُمْ مِنْهُ رَحْمَةً إِذَا فَرِيقٌ مِنْهُمْ بِرَبِّهِمْ يُشْرِكُونَ﴾


३३.
आणि लोकांना जेव्हा एखादे दुःख पोहचते, तेव्हा आपल्या पालनकर्त्याकडे रुजू होऊन दुआ- प्रार्थना करू लागतात आणि जेव्हा तो आपल्यातर्फे दया-कृपेची गोडी चाखवितो, तेव्हा त्यांच्यातला एक गट आपल्या पालनकर्त्यासोबत दुसऱ्याला त्याचा सहभागी ठरवू लागतो.

34- ﴿لِيَكْفُرُوا بِمَا آتَيْنَاهُمْ ۚ فَتَمَتَّعُوا فَسَوْفَ تَعْلَمُونَ﴾


३४. यासाठी की, जे काही आम्ही त्यांना प्रदान केले आहे कृतघ्नता दाखवावी. ठीक आहे. तुम्ही लाभ उचलून घ्या. फार लवकर तुम्हाला माहीत पडेल.

35- ﴿أَمْ أَنْزَلْنَا عَلَيْهِمْ سُلْطَانًا فَهُوَ يَتَكَلَّمُ بِمَا كَانُوا بِهِ يُشْرِكُونَ﴾


३५. काय आम्ही यांच्यावर एखादी सनद अवतरित केली आहे, जी त्यास निवेदिते, ज्यास हे अल्लाहसोबत सहभागी ठरवीत आहेत.

36- ﴿وَإِذَا أَذَقْنَا النَّاسَ رَحْمَةً فَرِحُوا بِهَا ۖ وَإِنْ تُصِبْهُمْ سَيِّئَةٌ بِمَا قَدَّمَتْ أَيْدِيهِمْ إِذَا هُمْ يَقْنَطُونَ﴾


३६.
आणि जेव्हा आम्ही लोकांना रहमत (दया-कृपे)ची गोडी चाखिवतो तेव्हा ते खूप आनंदित होतात आणि जर त्यांना आपल्या हातांच्या दुष्कर्मामुळे एखादे दुःख पोहचते, तेव्हा अचानक ते निराश होतात.

37- ﴿أَوَلَمْ يَرَوْا أَنَّ اللَّهَ يَبْسُطُ الرِّزْقَ لِمَنْ يَشَاءُ وَيَقْدِرُ ۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَاتٍ لِقَوْمٍ يُؤْمِنُونَ﴾


३७. काय त्यांनी हे नाही पाहिले की अल्लाह ज्याला इच्छितो भरपूर आजिविका (रोजी) देतो आणि ज्याला इच्छितो कमी. यातही त्या लोकांकरिता निशाण्या आहेत, जे ईमान राखतात.

38- ﴿فَآتِ ذَا الْقُرْبَىٰ حَقَّهُ وَالْمِسْكِينَ وَابْنَ السَّبِيلِ ۚ ذَٰلِكَ خَيْرٌ لِلَّذِينَ يُرِيدُونَ وَجْهَ اللَّهِ ۖ وَأُولَٰئِكَ هُمُ الْمُفْلِحُونَ﴾


३८. यास्तव जवळच्या नातेवाईकाला, गरीबाला, प्रवाशाला, प्रत्येकाला त्याचा हक्क द्या. हे त्यांच्यासाठी अधिक चांगले आहे जे अल्लाहच्या मुखाचे दर्शन घेऊ इच्छितात. असेच लोक मुक्ती प्राप्त करणारे आहेत.

39- ﴿وَمَا آتَيْتُمْ مِنْ رِبًا لِيَرْبُوَ فِي أَمْوَالِ النَّاسِ فَلَا يَرْبُو عِنْدَ اللَّهِ ۖ وَمَا آتَيْتُمْ مِنْ زَكَاةٍ تُرِيدُونَ وَجْهَ اللَّهِ فَأُولَٰئِكَ هُمُ الْمُضْعِفُونَ﴾


३९.
आणि तुम्ही जे काही व्याजाने देता की लोकांचे धन वाढत राहावे ते अल्लाहच्या येथे वाढत नाही आणि जे काही (सदका-दान आणि) जकात (कर्तव्य दान) तुम्ही अल्लाहचे मुख पाहण्या (मर्जी संपादण्या) करिता द्याल तर असेच लोक आपले (धन) वाढविणारे आहेत.

40- ﴿اللَّهُ الَّذِي خَلَقَكُمْ ثُمَّ رَزَقَكُمْ ثُمَّ يُمِيتُكُمْ ثُمَّ يُحْيِيكُمْ ۖ هَلْ مِنْ شُرَكَائِكُمْ مَنْ يَفْعَلُ مِنْ ذَٰلِكُمْ مِنْ شَيْءٍ ۚ سُبْحَانَهُ وَتَعَالَىٰ عَمَّا يُشْرِكُونَ﴾


४०. अल्लाह तो आहे, ज्याने तुम्हाला निर्माण केले, मग आजिविका प्रदान केली, मग मृत्यु देईल, पुन्हा दुसऱ्यांदा जिवंत करील. आता सांगा, तुम्ही ठरविलेल्या (अल्लाहच्या) सहभागींपैकी एक तरी असा आहे जो या गोष्टींपैकी काहीतरी करू शकत असेल. अल्लाहकरिता पवित्रता आणि श्रेष्ठता आहे अशा त्या प्रत्येक सहभागीपेक्षा, ज्याला हे लोक मनाने रचून घेतात.

41- ﴿ظَهَرَ الْفَسَادُ فِي الْبَرِّ وَالْبَحْرِ بِمَا كَسَبَتْ أَيْدِي النَّاسِ لِيُذِيقَهُمْ بَعْضَ الَّذِي عَمِلُوا لَعَلَّهُمْ يَرْجِعُونَ﴾


४१. खुष्की आणि पाण्यात लोकांच्या दुष्कर्मांमुळे उत्पात (फसाद) पसरला, यासाठी की त्यांना, त्यांच्या काही दुष्कर्मांचे फळ अल्लाहने चाखवावे. (फार) संभव आहे की त्यांनी (दुष्कर्म करणे) थांबवावे.

42- ﴿قُلْ سِيرُوا فِي الْأَرْضِ فَانْظُرُوا كَيْفَ كَانَ عَاقِبَةُ الَّذِينَ مِنْ قَبْلُ ۚ كَانَ أَكْثَرُهُمْ مُشْرِكِينَ﴾


४२. तुम्ही सांगा, जरा जमिनीवर हिंडून फिरून पाहा तरी की पूर्वी होऊन गेलेल्या लोकांचा शेवट कसा झाला, ज्यांच्यात अधिकांश लोक अनेक ईश्वरांची पूजा करणारे होते.

43- ﴿فَأَقِمْ وَجْهَكَ لِلدِّينِ الْقَيِّمِ مِنْ قَبْلِ أَنْ يَأْتِيَ يَوْمٌ لَا مَرَدَّ لَهُ مِنَ اللَّهِ ۖ يَوْمَئِذٍ يَصَّدَّعُونَ﴾


४३. तेव्हा तुम्ही तुमचे तोंड त्या सरळ आणि सच्चा दीन (धर्मा) कडेच राखा, याआधी की तो दिवस यावा, ज्याचे परतणे अल्लाहतर्फे नाहीच. त्या दिवशी सर्व वेगवेगळे होतील.

44- ﴿مَنْ كَفَرَ فَعَلَيْهِ كُفْرُهُ ۖ وَمَنْ عَمِلَ صَالِحًا فَلِأَنْفُسِهِمْ يَمْهَدُونَ﴾


४४. (सत्याचा) इन्कार करणाऱ्यांवर त्यांचा इन्कार ओढवेल, आणि सत्कर्म करणारे आपल्याच विश्रामगृहाला सुंदर बनवित आहेत.

45- ﴿لِيَجْزِيَ الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ مِنْ فَضْلِهِ ۚ إِنَّهُ لَا يُحِبُّ الْكَافِرِينَ﴾


४५. यासाठी की अल्लाहने आपल्या कृपेने त्यांना फल प्रदान करावे. ज्याने ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिला तो काफिरांना दोस्त राखत नाही.

46- ﴿وَمِنْ آيَاتِهِ أَنْ يُرْسِلَ الرِّيَاحَ مُبَشِّرَاتٍ وَلِيُذِيقَكُمْ مِنْ رَحْمَتِهِ وَلِتَجْرِيَ الْفُلْكُ بِأَمْرِهِ وَلِتَبْتَغُوا مِنْ فَضْلِهِ وَلَعَلَّكُمْ تَشْكُرُونَ﴾


४६.
आणि त्याच्या निशाण्यांपैकी शुभ समाचार देणाऱ्या वाऱ्यांना चालविणेही आहे, यासाठी की तुम्हाला आपल्या दया-कृपेची गोडी चाखवावी, आणि यासाठी की त्याच्या आदेशाने नौका चालवाव्यात आणि यासाठी की त्याच्या कृपेचा तुम्ही शोध घ्यावा, आणि यासाठी की तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी.

47- ﴿وَلَقَدْ أَرْسَلْنَا مِنْ قَبْلِكَ رُسُلًا إِلَىٰ قَوْمِهِمْ فَجَاءُوهُمْ بِالْبَيِّنَاتِ فَانْتَقَمْنَا مِنَ الَّذِينَ أَجْرَمُوا ۖ وَكَانَ حَقًّا عَلَيْنَا نَصْرُ الْمُؤْمِنِينَ﴾


४७.
आणि आम्ही तुमच्या पूर्वीही (आपल्या) पैगंबरांना त्यांच्या जनसमूहांकडे पाठविले, ते त्यांच्याजवळ प्रमाण (पुरावे) घेऊन आले, मग आम्ही तुमच्या अपराधांचा सूड (प्रतिशोध) घेतला. ईमान राखणाऱ्यांना मदत करणे आमच्यावर अनिवार्य आहे.

48- ﴿اللَّهُ الَّذِي يُرْسِلُ الرِّيَاحَ فَتُثِيرُ سَحَابًا فَيَبْسُطُهُ فِي السَّمَاءِ كَيْفَ يَشَاءُ وَيَجْعَلُهُ كِسَفًا فَتَرَى الْوَدْقَ يَخْرُجُ مِنْ خِلَالِهِ ۖ فَإِذَا أَصَابَ بِهِ مَنْ يَشَاءُ مِنْ عِبَادِهِ إِذَا هُمْ يَسْتَبْشِرُونَ﴾


४८.
तो अल्लाहच होय जो वारे वाहवितो, ते ढगांना उचलतात, मग अल्लाह आपल्या मर्जीने त्यांना आकाशात पसरवितो आणि त्यांचे तुकडे तुकडे करतो, मग तुम्ही पाहता की त्यांच्यातून (पाण्याचे) थेंब बाहेर पडतात आणि ज्यांना अल्लाह इच्छितो, त्या दासांवर तो पर्जन्यवृष्टी करतो तेव्हा ते खूप आनंदित होतात.

49- ﴿وَإِنْ كَانُوا مِنْ قَبْلِ أَنْ يُنَزَّلَ عَلَيْهِمْ مِنْ قَبْلِهِ لَمُبْلِسِينَ﴾


४९. आणि विश्वास करा की पाऊस त्यांच्यावर पडण्यापूर्वी ते निराश होत होते.

50- ﴿فَانْظُرْ إِلَىٰ آثَارِ رَحْمَتِ اللَّهِ كَيْفَ يُحْيِي الْأَرْضَ بَعْدَ مَوْتِهَا ۚ إِنَّ ذَٰلِكَ لَمُحْيِي الْمَوْتَىٰ ۖ وَهُوَ عَلَىٰ كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ﴾


५०. तेव्हा तुम्ही अल्लाहच्या कृपा-चिन्हांना पाहा की जमिनीच्या मृत्युनंतर कशा प्रकारे अल्लाह तिला (पुन्हा) जिवंत करतो. निःसंशय, तोच मेलेल्यांना (पुनश्च) जिवंत करणारा आहे आणि तो प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे.

51- ﴿وَلَئِنْ أَرْسَلْنَا رِيحًا فَرَأَوْهُ مُصْفَرًّا لَظَلُّوا مِنْ بَعْدِهِ يَكْفُرُونَ﴾


५१. आणि जर आम्ही वेगवान वारा वाहवू आणि हे लोक आपल्या शेतीला (कोमेजलेली) पिवळी पडलेली पाहतील तर मग त्यानंतर ते कृतघ्नता दाखवू लागतील.

52- ﴿فَإِنَّكَ لَا تُسْمِعُ الْمَوْتَىٰ وَلَا تُسْمِعُ الصُّمَّ الدُّعَاءَ إِذَا وَلَّوْا مُدْبِرِينَ﴾


५२. निःसंशय, तुम्ही मृतांना ऐकवू शकत नाही आणि ना बहिऱ्यांना (आपली) पुकार ऐकवू शकता, जेव्हा ते पाठ फिरवून वळले असतील.

53- ﴿وَمَا أَنْتَ بِهَادِ الْعُمْيِ عَنْ ضَلَالَتِهِمْ ۖ إِنْ تُسْمِعُ إِلَّا مَنْ يُؤْمِنُ بِآيَاتِنَا فَهُمْ مُسْلِمُونَ﴾


५३. आणि ना तुम्ही आंधळ्यांना त्यांच्या मार्गभ्रष्टतेतून काढून मार्गदर्शन करणारे आहात. तुम्ही तर केवळ अशाच लोकांना ऐकवू शकता जे आमच्या आयतींवर ईमान राखतात आणि ते आज्ञाधारकही आहेत.

54- ﴿۞ اللَّهُ الَّذِي خَلَقَكُمْ مِنْ ضَعْفٍ ثُمَّ جَعَلَ مِنْ بَعْدِ ضَعْفٍ قُوَّةً ثُمَّ جَعَلَ مِنْ بَعْدِ قُوَّةٍ ضَعْفًا وَشَيْبَةً ۚ يَخْلُقُ مَا يَشَاءُ ۖ وَهُوَ الْعَلِيمُ الْقَدِيرُ﴾


५४.
अल्लाह तो आहे, ज्याने तुम्हाला कमजोर अवस्थेत निर्माण केले, मग त्या दुर्बलतेनंतर शक्ती-सामर्थ्य प्रदान केले, मग त्या शक्तीनंतर कमजोरी आणि म्हातारपण दिले. तो जे इच्छितो निर्माण करतो, तो सर्वांना चांगल्या प्रकारे जाणतो आणि सर्वांवर पूर्ण सामर्थ्य राखतो.

55- ﴿وَيَوْمَ تَقُومُ السَّاعَةُ يُقْسِمُ الْمُجْرِمُونَ مَا لَبِثُوا غَيْرَ سَاعَةٍ ۚ كَذَٰلِكَ كَانُوا يُؤْفَكُونَ﴾


५५. आणि ज्या दिवशी कयामत येईल, अपराधी लोक शपथपूर्वक सांगतील की (जगात) एक क्षणाशिवाय जास्त राहिलो नाहीत. अशाच प्रकारे बहकलेलेच राहिले.

56- ﴿وَقَالَ الَّذِينَ أُوتُوا الْعِلْمَ وَالْإِيمَانَ لَقَدْ لَبِثْتُمْ فِي كِتَابِ اللَّهِ إِلَىٰ يَوْمِ الْبَعْثِ ۖ فَهَٰذَا يَوْمُ الْبَعْثِ وَلَٰكِنَّكُمْ كُنْتُمْ لَا تَعْلَمُونَ﴾


५६. आणि ज्या लोकांना ज्ञान आणि ईमान प्रदान केले गेले, ते उत्तर देतील की, तुम्ही तर जसे की अल्लाहच्या ग्रंथात आहे, कयामतच्या दिवसापर्यंत राहिलात. आजचा हा दिवस कयामतचाच दिवस आहे. परंतु तुम्ही तर विश्वासच ठेवत नव्हते.

57- ﴿فَيَوْمَئِذٍ لَا يَنْفَعُ الَّذِينَ ظَلَمُوا مَعْذِرَتُهُمْ وَلَا هُمْ يُسْتَعْتَبُونَ﴾


५७.
तेव्हा त्या दिवशी अत्याचारी लोकांना त्यांचे प्रमाण-पुरावे काहीच उपयोगी पडणार नाहीत आणि ना त्यांच्याकडून क्षमा-याचनेची मागणी केली जाईल, ना कर्म मागितले जाईल.

58- ﴿وَلَقَدْ ضَرَبْنَا لِلنَّاسِ فِي هَٰذَا الْقُرْآنِ مِنْ كُلِّ مَثَلٍ ۚ وَلَئِنْ جِئْتَهُمْ بِآيَةٍ لَيَقُولَنَّ الَّذِينَ كَفَرُوا إِنْ أَنْتُمْ إِلَّا مُبْطِلُونَ﴾


५८. आणि निःसंशय, आम्ही या कुरआनात लोकांसमोर सर्व उदाहरणे प्रस्तुत केली आहेत. तुम्ही त्यांच्याजवळ कोणतीही निशाणी आणाल तरी ते हेच म्हणतील की तुम्ही खोटे आहात.

59- ﴿كَذَٰلِكَ يَطْبَعُ اللَّهُ عَلَىٰ قُلُوبِ الَّذِينَ لَا يَعْلَمُونَ﴾


५९. अल्लाह, त्या लोकांच्या हृदयांवर, जे समज बाळगत नाहीत, अशाच प्रकारे मोहर (सील) लावतो.

60- ﴿فَاصْبِرْ إِنَّ وَعْدَ اللَّهِ حَقٌّ ۖ وَلَا يَسْتَخِفَّنَّكَ الَّذِينَ لَا يُوقِنُونَ﴾


६०. यास्तव तुम्ही धीर-संयम राखा. निःसंशय, अल्लाहचा वायदा सच्चा आहे. तुम्हाला त्या लोकांनी हलके (अधीर) जाणू नये, जे विश्वास बाळगत नाहीत.

الترجمات والتفاسير لهذه السورة: