البحث

عبارات مقترحة:

الأعلى

كلمة (الأعلى) اسمُ تفضيل من العُلُوِّ، وهو الارتفاع، وهو اسمٌ من...

الرحمن

هذا تعريف باسم الله (الرحمن)، وفيه معناه في اللغة والاصطلاح،...

القهار

كلمة (القهّار) في اللغة صيغة مبالغة من القهر، ومعناه الإجبار،...

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

1- ﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ يَا أَيُّهَا الْمُزَّمِّلُ﴾


१. हे चादरीत लपेटून घेणाऱ्या,

2- ﴿قُمِ اللَّيْلَ إِلَّا قَلِيلًا﴾


२. रात्री (तहज्जुदच्या नमाजसाठी) उठून उभे राहा, परंतु थोडा वेळ.

3- ﴿نِصْفَهُ أَوِ انْقُصْ مِنْهُ قَلِيلًا﴾


३. अर्धी रात्र किंवा त्यापेक्षाही काही कमी.

4- ﴿أَوْ زِدْ عَلَيْهِ وَرَتِّلِ الْقُرْآنَ تَرْتِيلًا﴾


४. किंवा त्यावर वाढवून आणि कुरआनाचे थोडे थांबून थांबून (स्पष्टतः) पठण करा.

5- ﴿إِنَّا سَنُلْقِي عَلَيْكَ قَوْلًا ثَقِيلًا﴾


५. निःसंशय, आम्ही तुमच्यावर एक भारदस्त गोष्ट लवकरच अवतरित करू.

6- ﴿إِنَّ نَاشِئَةَ اللَّيْلِ هِيَ أَشَدُّ وَطْئًا وَأَقْوَمُ قِيلًا﴾


६. निःसंशय, रात्रीचे उठणे मनाच्या एकाग्रतेकरिता फार योग्य आहे आणि कथनास मोठे दुरुस्त (उचित) करणारे आहे.

7- ﴿إِنَّ لَكَ فِي النَّهَارِ سَبْحًا طَوِيلًا﴾


७. निश्चितच, दिवसा तुम्हाला अनेक कामे असतात.

8- ﴿وَاذْكُرِ اسْمَ رَبِّكَ وَتَبَتَّلْ إِلَيْهِ تَبْتِيلًا﴾


८. आणि तुम्ही आपल्या पालनकर्त्याचे नामःस्मरण करीत जा आणि संपूर्ण सृष्टी (निर्मिती) पासून अलग होऊन त्याच्याकडे ध्यानमग्न व्हा.

9- ﴿رَبُّ الْمَشْرِقِ وَالْمَغْرِبِ لَا إِلَٰهَ إِلَّا هُوَ فَاتَّخِذْهُ وَكِيلًا﴾


९. पूर्व आणि पश्चिमेचा स्वामी, ज्याच्याखेरीज कोणीही उपास्य नाही. तुम्ही त्यालाच आपला कार्यसाधक (व संरक्षक) बनवा.

10- ﴿وَاصْبِرْ عَلَىٰ مَا يَقُولُونَ وَاهْجُرْهُمْ هَجْرًا جَمِيلًا﴾


१०. आणि जे काही ते सांगतात, तुम्ही ते सहन करीत राहा आणि त्यांना चांगल्या प्रकारे सोडून द्या.

11- ﴿وَذَرْنِي وَالْمُكَذِّبِينَ أُولِي النَّعْمَةِ وَمَهِّلْهُمْ قَلِيلًا﴾


११. आणि मला व त्या खोटे ठरविणाऱ्या सुसंपन्न लोकांना सोडून द्या, आणि त्यांना थोडी सवड द्या.

12- ﴿إِنَّ لَدَيْنَا أَنْكَالًا وَجَحِيمًا﴾


१२. निःसंशय, आमच्याजवळ कठोर बेड्या आहेत, आणि धगधग पेटत असलेली जहन्नम आहे.

13- ﴿وَطَعَامًا ذَا غُصَّةٍ وَعَذَابًا أَلِيمًا﴾


१३. आणि गळ्यात अडकणारे जेवण आहे आणि दुःखदायक अज़ाब आहे.

14- ﴿يَوْمَ تَرْجُفُ الْأَرْضُ وَالْجِبَالُ وَكَانَتِ الْجِبَالُ كَثِيبًا مَهِيلًا﴾


१४. ज्या दिवशी धरती आणि पर्वत कंपित होतील आणि पर्वत भुरभुरित वाळूच्या टेकड्यांसारखे होतील.

15- ﴿إِنَّا أَرْسَلْنَا إِلَيْكُمْ رَسُولًا شَاهِدًا عَلَيْكُمْ كَمَا أَرْسَلْنَا إِلَىٰ فِرْعَوْنَ رَسُولًا﴾


१५. निःसंशय, आम्ही तुमच्याकडेही तुमच्यावर साक्ष देणारा पैगंबर पाठविला आहे, जसा आम्ही फिरऔनकडे रसूल (पैगंबर) पाठविला होता.

16- ﴿فَعَصَىٰ فِرْعَوْنُ الرَّسُولَ فَأَخَذْنَاهُ أَخْذًا وَبِيلًا﴾


१६. तेव्हा फिरऔनने त्या पैगंबराची अवज्ञा केली तर आम्ही त्याला घोर संकटात धरले.

17- ﴿فَكَيْفَ تَتَّقُونَ إِنْ كَفَرْتُمْ يَوْمًا يَجْعَلُ الْوِلْدَانَ شِيبًا﴾


१७. तुम्ही जर इन्कारी राहाल तर त्या दिवशी कसे सुरक्षित राहाल, जो दिवस लहान बालकांना वृद्ध करून टाकील.१

18- ﴿السَّمَاءُ مُنْفَطِرٌ بِهِ ۚ كَانَ وَعْدُهُ مَفْعُولًا﴾


१८. ज्या दिवशी आकाश विदीर्ण होईल, अल्लाहचा हा वायदा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.

19- ﴿إِنَّ هَٰذِهِ تَذْكِرَةٌ ۖ فَمَنْ شَاءَ اتَّخَذَ إِلَىٰ رَبِّهِ سَبِيلًا﴾


१९. निःसंशय, हा बोध (उपदेश) आहे, तेव्हा जो इच्छिल त्याने आपल्या पालनकर्त्याकडे (जाण्या) चा मार्ग पत्करावा.

20- ﴿۞ إِنَّ رَبَّكَ يَعْلَمُ أَنَّكَ تَقُومُ أَدْنَىٰ مِنْ ثُلُثَيِ اللَّيْلِ وَنِصْفَهُ وَثُلُثَهُ وَطَائِفَةٌ مِنَ الَّذِينَ مَعَكَ ۚ وَاللَّهُ يُقَدِّرُ اللَّيْلَ وَالنَّهَارَ ۚ عَلِمَ أَنْ لَنْ تُحْصُوهُ فَتَابَ عَلَيْكُمْ ۖ فَاقْرَءُوا مَا تَيَسَّرَ مِنَ الْقُرْآنِ ۚ عَلِمَ أَنْ سَيَكُونُ مِنْكُمْ مَرْضَىٰ ۙ وَآخَرُونَ يَضْرِبُونَ فِي الْأَرْضِ يَبْتَغُونَ مِنْ فَضْلِ اللَّهِ ۙ وَآخَرُونَ يُقَاتِلُونَ فِي سَبِيلِ اللَّهِ ۖ فَاقْرَءُوا مَا تَيَسَّرَ مِنْهُ ۚ وَأَقِيمُوا الصَّلَاةَ وَآتُوا الزَّكَاةَ وَأَقْرِضُوا اللَّهَ قَرْضًا حَسَنًا ۚ وَمَا تُقَدِّمُوا لِأَنْفُسِكُمْ مِنْ خَيْرٍ تَجِدُوهُ عِنْدَ اللَّهِ هُوَ خَيْرًا وَأَعْظَمَ أَجْرًا ۚ وَاسْتَغْفِرُوا اللَّهَ ۖ إِنَّ اللَّهَ غَفُورٌ رَحِيمٌ﴾


२०.
निःसंशय, तुमचा पालनकर्ता चांगल्या प्रकारे जाणतो की तुम्ही आणि तुमच्यासोबत असलेल्या लोकांचा एक समूह सुमारे दोन तृतियांश रात्रीला आणि अर्ध्या रात्रीला आणि एक तृतियांश रात्रीला (तहज्जुदच्या नमाजसाठी) उभे राहतात, आणि रात्र-दिवसाचे पूर्ण अनुमान अल्लाहलाच आहे.
तो (चांगल्या प्रकारे) जाणतो की तुम्ही ते मुळीच निभावू शकणार नाहीत, तेव्हा त्याने तुमच्यावर कृपा केली, यास्तव जेवढे कुरआन पठण करणे तुम्हाला सहज असेल, तेवढेच पठण करा.
तो जाणतो की तुमच्यापैकी काही रोगीही असतील, दुसरे काही जमिनीवर हिंडून फिरून अल्लाहची कृपा (अर्थात रोजीरोटी) शोधतील आणि काही अल्लाहच्या मार्गात जिहादही करतील, तेव्हा तुम्ही जेवढे (कुरआन) पठण सहजपणे करू शकता, तेवढे करा, आणि नमाज नियमितपणे पढत राहा आणि जकात (देखील) देत राहा, आणि अल्लाहला चांगले कर्ज द्या, आणि जी नेकी (सत्कर्मे) तुम्ही आपल्या स्वतःसाठी पुढे पाठवाल ती अल्लाहच्या ठिकाणी सर्वोत्तमरित्या मोबदल्यात अधिक प्राप्त कराल. आणि अल्लाहजवळ माफी मागत राहा. निःसंशय, अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे.

الترجمات والتفاسير لهذه السورة: