لقمان

تفسير سورة لقمان

الترجمة الماراتية

मराठी

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ الم﴾

१. अलिफ. लाम. मीम

﴿تِلْكَ آيَاتُ الْكِتَابِ الْحَكِيمِ﴾

२. या दिव्य ज्ञानयुक्त ग्रंथाच्या आयती आहेत.

﴿هُدًى وَرَحْمَةً لِلْمُحْسِنِينَ﴾

३. जो अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता मार्गदर्शन आणि (सर्वथा) दया-कृपा आहे.

﴿الَّذِينَ يُقِيمُونَ الصَّلَاةَ وَيُؤْتُونَ الزَّكَاةَ وَهُمْ بِالْآخِرَةِ هُمْ يُوقِنُونَ﴾

४. जे लोक नेहमी वक्तशीरपणे नमाज पढतात आणि जकात (धर्मदान) देतात, आणि आखिरतवर (पूर्ण) विश्वास ठेवतात.

﴿أُولَٰئِكَ عَلَىٰ هُدًى مِنْ رَبِّهِمْ ۖ وَأُولَٰئِكَ هُمُ الْمُفْلِحُونَ﴾

५. हेच ते लोक होत, जे आपल्या पालनकर्त्यातर्फे मार्गदर्शनावर आहेत आणि हेच लोक मुक्ती प्राप्त करणारे आहेत.

﴿وَمِنَ النَّاسِ مَنْ يَشْتَرِي لَهْوَ الْحَدِيثِ لِيُضِلَّ عَنْ سَبِيلِ اللَّهِ بِغَيْرِ عِلْمٍ وَيَتَّخِذَهَا هُزُوًا ۚ أُولَٰئِكَ لَهُمْ عَذَابٌ مُهِينٌ﴾

६.
आणि काही लोक असेही आहेत जे निरर्थक, वाह्यात गोष्टी विकत घेतात की अज्ञानतेसह लोकांना अल्लाहच्या मार्गापासून दूर करावे आणि त्याला थट्टा-मस्करी बनवावे. हेच ते लोक होत, ज्यांच्यासाठी अपमानित करणारा अज़ाब (शिक्षा-यातना) आहे.

﴿وَإِذَا تُتْلَىٰ عَلَيْهِ آيَاتُنَا وَلَّىٰ مُسْتَكْبِرًا كَأَنْ لَمْ يَسْمَعْهَا كَأَنَّ فِي أُذُنَيْهِ وَقْرًا ۖ فَبَشِّرْهُ بِعَذَابٍ أَلِيمٍ﴾

७.
आणि जेव्हा त्याच्यासमोर आमच्या आयती वाचून ऐकविल्या जातात तेव्हा घमेंडीने अशा प्रकारे तोंड फिरवितो की जणू त्याने ऐकलेच नाही, जणू काही त्याच्या दोन्ही कानात बधिरता आहे. तुम्ही त्याला दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातने) ची खबर द्या.

﴿إِنَّ الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ لَهُمْ جَنَّاتُ النَّعِيمِ﴾

८. निःसंशय, ज्या लोकांनी ईमान स्वीकारले व जे सत्कर्म करीत राहिले त्याच्याकरिता सुखांनी युक्त अशी जन्नत आहे.

﴿خَالِدِينَ فِيهَا ۖ وَعْدَ اللَّهِ حَقًّا ۚ وَهُوَ الْعَزِيزُ الْحَكِيمُ﴾

९. जिथे ते सदैव काळ राहतील, अल्लाहचा सच्चा वायदा आहे. तो मोठा प्रभुत्वशाली आणि पूर्णतः बुद्धिकौशल्य (हिकमत) बाळगणारा आहे.

﴿خَلَقَ السَّمَاوَاتِ بِغَيْرِ عَمَدٍ تَرَوْنَهَا ۖ وَأَلْقَىٰ فِي الْأَرْضِ رَوَاسِيَ أَنْ تَمِيدَ بِكُمْ وَبَثَّ فِيهَا مِنْ كُلِّ دَابَّةٍ ۚ وَأَنْزَلْنَا مِنَ السَّمَاءِ مَاءً فَأَنْبَتْنَا فِيهَا مِنْ كُلِّ زَوْجٍ كَرِيمٍ﴾

१०. त्यानेच आकाशांना खांबांविना बनविले आहे.
तुम्ही त्यांना पाहता आणि त्याने जमिनीवर पहाड रोवले, यासाठी की तिने तुम्हाला कंपित करू न शकावे आणि प्रत्येक प्रकारचे सजीव जमिनीत पसरविले आणि त्याने आकाशातून पाऊस पाडून प्रत्येक प्रकारच्या सुंदर जोड्या उगविल्या.

﴿هَٰذَا خَلْقُ اللَّهِ فَأَرُونِي مَاذَا خَلَقَ الَّذِينَ مِنْ دُونِهِ ۚ بَلِ الظَّالِمُونَ فِي ضَلَالٍ مُبِينٍ﴾

११.
ही आहे अल्लाहची सृष्टी (मखलूक), आता तुम्ही मला याच्याखेरीज दुसऱ्या कोणाची सृष्टी तर दाखवा (काही नाही) हे अत्याचारी लोक उघड मार्गभ्रष्टतेत आहेत.

﴿وَلَقَدْ آتَيْنَا لُقْمَانَ الْحِكْمَةَ أَنِ اشْكُرْ لِلَّهِ ۚ وَمَنْ يَشْكُرْ فَإِنَّمَا يَشْكُرُ لِنَفْسِهِ ۖ وَمَنْ كَفَرَ فَإِنَّ اللَّهَ غَنِيٌّ حَمِيدٌ﴾

१२. आणि आम्ही निःसंशय लुकमानला बुद्धिकौशल्य प्रदान केले१ की तुम्ही अल्लाहशी कृतज्ञशील राहा.
प्रत्येक कृतज्ञशील मनुष्य आपल्याच फायद्याकरिता कृतज्ञता व्यक्त करतो, जो कोणी कृतघ्नता दर्शवील तर त्याने जाणून घ्यावे की अल्लाह निःस्पृह, प्रशंसनीय आहे.

﴿وَإِذْ قَالَ لُقْمَانُ لِابْنِهِ وَهُوَ يَعِظُهُ يَا بُنَيَّ لَا تُشْرِكْ بِاللَّهِ ۖ إِنَّ الشِّرْكَ لَظُلْمٌ عَظِيمٌ﴾

१३.
आणि जेव्हा लुकमान उपदेश करताना आपल्या पुत्रास म्हणाले, हे माझ्या प्रिय पुत्रा! अल्लाहसोबत दुसऱ्या कोणाला सहभागी ठरवू नकोस. निःसंशय, अल्ला चा सहभागी ठरविणे फार मोठा अत्याचार आहे.

﴿وَوَصَّيْنَا الْإِنْسَانَ بِوَالِدَيْهِ حَمَلَتْهُ أُمُّهُ وَهْنًا عَلَىٰ وَهْنٍ وَفِصَالُهُ فِي عَامَيْنِ أَنِ اشْكُرْ لِي وَلِوَالِدَيْكَ إِلَيَّ الْمَصِيرُ﴾

१४. आम्ही माणसाला माता-पित्याविषयी शिकवण दिली आहे. त्याच्या मातेने यातनांवर यातना सहन करून त्याला गर्भात ठेवले आणि त्याचे दूध सोडविण्यात दोन वर्षे लागली. तेव्हा तू माझे आणि आपल्या माता-पित्याचे आभार मान. शेवटी माझ्याचकडे परतून यायचे आहे.

﴿وَإِنْ جَاهَدَاكَ عَلَىٰ أَنْ تُشْرِكَ بِي مَا لَيْسَ لَكَ بِهِ عِلْمٌ فَلَا تُطِعْهُمَا ۖ وَصَاحِبْهُمَا فِي الدُّنْيَا مَعْرُوفًا ۖ وَاتَّبِعْ سَبِيلَ مَنْ أَنَابَ إِلَيَّ ۚ ثُمَّ إِلَيَّ مَرْجِعُكُمْ فَأُنَبِّئُكُمْ بِمَا كُنْتُمْ تَعْمَلُونَ﴾

१५.
आणि जर ते दोघे (माता-पिता) तुझ्यावर या गोष्टीचा दबाव टाकतील की तू माझ्यासोबत (दुसऱ्याला) सहभागी ठरव, ज्याचे तुला ज्ञान नसावे, तेव्हा तू त्यांचे आज्ञापालन करू नकोस, परंतु या जगात त्यांच्याशी भलेपणाचा व्यवहार कर आणि त्याच्या मार्गावर चालत राहा, जो माझ्याकडे झुकलेला असेल. तुम्हा सर्वांचे परतणे माझ्याचकडे आहे. तुम्ही जे काही करता त्यासंबंधी मी त्या वेळी तुम्हाला माहीत करेन.

﴿يَا بُنَيَّ إِنَّهَا إِنْ تَكُ مِثْقَالَ حَبَّةٍ مِنْ خَرْدَلٍ فَتَكُنْ فِي صَخْرَةٍ أَوْ فِي السَّمَاوَاتِ أَوْ فِي الْأَرْضِ يَأْتِ بِهَا اللَّهُ ۚ إِنَّ اللَّهَ لَطِيفٌ خَبِيرٌ﴾

१६.
प्रिय पुत्रा! जर एखादी वस्तू राईच्या दाण्याइतकी असेल, मग तोही एखाद्या दगडाखाली असेल किंवा आकाशांमध्ये असेल किंवा जमिनीत असेल, तर तिला अल्लाह अवश्य आणील. अल्लाह अतिशय सूक्ष्मदर्श आणि जाणणारा आहे.

﴿يَا بُنَيَّ أَقِمِ الصَّلَاةَ وَأْمُرْ بِالْمَعْرُوفِ وَانْهَ عَنِ الْمُنْكَرِ وَاصْبِرْ عَلَىٰ مَا أَصَابَكَ ۖ إِنَّ ذَٰلِكَ مِنْ عَزْمِ الْأُمُورِ﴾

१७.
हे माझ्या प्रिय पुत्रा! तू नमाज कायम राख, सत्कर्मांचा आदेश दे आणि दुष्कर्मांपासून रोखत जा, आणि जर तुझ्यावर संकट आले तर धीर-संयम राख (विश्वास ठेव) ही सर्व ताकीदी कामांपैकी आहेत.

﴿وَلَا تُصَعِّرْ خَدَّكَ لِلنَّاسِ وَلَا تَمْشِ فِي الْأَرْضِ مَرَحًا ۖ إِنَّ اللَّهَ لَا يُحِبُّ كُلَّ مُخْتَالٍ فَخُورٍ﴾

१८. आणि लोकांसमोर आपले गाल फुगवू नका आणि जमिनीवर ताठपणाने घमेंड दाखवत चालू नका. कोणत्याही गर्विष्ठ , घमेंडी माणसाला अल्लाह पसंत करीत नाही.

﴿وَاقْصِدْ فِي مَشْيِكَ وَاغْضُضْ مِنْ صَوْتِكَ ۚ إِنَّ أَنْكَرَ الْأَصْوَاتِ لَصَوْتُ الْحَمِيرِ﴾

१९. आणि आपल्या चालण्यात मध्यमता राखा, आणि आपला आवाज (स्वर) सौम्य राख, निःसंशय, गाढवाचा आवाज अतिशय वाईट आवाज आहे.

﴿أَلَمْ تَرَوْا أَنَّ اللَّهَ سَخَّرَ لَكُمْ مَا فِي السَّمَاوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ وَأَسْبَغَ عَلَيْكُمْ نِعَمَهُ ظَاهِرَةً وَبَاطِنَةً ۗ وَمِنَ النَّاسِ مَنْ يُجَادِلُ فِي اللَّهِ بِغَيْرِ عِلْمٍ وَلَا هُدًى وَلَا كِتَابٍ مُنِيرٍ﴾

२०.
काय तुम्ही नाही पाहत की अल्लाहने जमीन आणि आकाशाच्या प्रत्येक वस्तूला आमच्या सेवेस लावून ठेवले आहे आणि आपल्या उघड आणि लपलेल्या देण्या तुमच्यावर पूर्ण केल्या आहेत, आणि काही लोक अल्लाहविषयी कसल्याही ज्ञानाविना, मार्गदर्शनाविना आणि दिव्य ग्रंथाविना वाद घालतात.

﴿وَإِذَا قِيلَ لَهُمُ اتَّبِعُوا مَا أَنْزَلَ اللَّهُ قَالُوا بَلْ نَتَّبِعُ مَا وَجَدْنَا عَلَيْهِ آبَاءَنَا ۚ أَوَلَوْ كَانَ الشَّيْطَانُ يَدْعُوهُمْ إِلَىٰ عَذَابِ السَّعِيرِ﴾

२१.
आणि जेव्हा त्यांना सांगितले जाते की अल्लाहने अवतरित केलेल्या वहयी (प्रकाशना) चे अनुसरण करा, तेव्हा म्हणतात की आम्ही तर ज्या मार्गावर आपल्या वाडवडिलांना पाहिले आहे, त्याच मार्गाचे अनुसरण करू. मग सैतान त्यांच्या वाडवडिलांना जहन्नमच्या शिक्षा-यातनेकडे बोलवित असला तरी!

﴿۞ وَمَنْ يُسْلِمْ وَجْهَهُ إِلَى اللَّهِ وَهُوَ مُحْسِنٌ فَقَدِ اسْتَمْسَكَ بِالْعُرْوَةِ الْوُثْقَىٰ ۗ وَإِلَى اللَّهِ عَاقِبَةُ الْأُمُورِ﴾

२२.
आणि जो मनुष्य आपल्या चेहऱ्याला (स्वतःला) अल्लाहच्या हवाली करील आणि ती नेक सदाचारीही असेल तर निश्चितच त्याने मजबूत आधार धरला. समस्त कर्मांची परिणीती अल्लाहकडे आहे.

﴿وَمَنْ كَفَرَ فَلَا يَحْزُنْكَ كُفْرُهُ ۚ إِلَيْنَا مَرْجِعُهُمْ فَنُنَبِّئُهُمْ بِمَا عَمِلُوا ۚ إِنَّ اللَّهَ عَلِيمٌ بِذَاتِ الصُّدُورِ﴾

२३. आणि काफिरांच्या कुप्र (इन्कारा) ने तुम्ही दुःखी होऊ नका. शेवटी त्या सर्वांना आमच्याचकडे परतून यायचे आहे. त्या वेळी आम्ही त्यांना दाखवू जे काही ते करीत राहिले. निःसंशय, अल्लाह हृदयातील रहस्यभेदांनाही जाणतो.

﴿نُمَتِّعُهُمْ قَلِيلًا ثُمَّ نَضْطَرُّهُمْ إِلَىٰ عَذَابٍ غَلِيظٍ﴾

२४.
आम्ही त्यांना काहीसा फायदा असाच पोहचवित राहू, परंतु शेवटी आम्ही त्यांना अतिशय लाचारीच्या अवस्थेत सक्त शिक्षा-यातनेकडे हाकत नेऊ.

﴿وَلَئِنْ سَأَلْتَهُمْ مَنْ خَلَقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ لَيَقُولُنَّ اللَّهُ ۚ قُلِ الْحَمْدُ لِلَّهِ ۚ بَلْ أَكْثَرُهُمْ لَا يَعْلَمُونَ﴾

२५.
आणि जर तुम्ही त्यांना विचाराल की आकाश आणि जमिनीचा निर्माण करणारा कोण आहे? तर हे अवश्य उत्तर देतील, अल्लाह! तेव्हा त्यांना सांगा की सर्व प्रशंसेस योग्य अल्लाहच आहे. परंतु त्यांच्यापैकी बहुतेक लोक जाणत नाहीत.

﴿لِلَّهِ مَا فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ ۚ إِنَّ اللَّهَ هُوَ الْغَنِيُّ الْحَمِيدُ﴾

२६.
आकाशांमध्ये आणि धरतीत जे काही आहे ते सर्व अल्लाहचेच आहे निःसंशय, अल्लाह मोठा निःस्पृह आणि स्तुती-प्रशंसेस पात्र आहे.

﴿وَلَوْ أَنَّمَا فِي الْأَرْضِ مِنْ شَجَرَةٍ أَقْلَامٌ وَالْبَحْرُ يَمُدُّهُ مِنْ بَعْدِهِ سَبْعَةُ أَبْحُرٍ مَا نَفِدَتْ كَلِمَاتُ اللَّهِ ۗ إِنَّ اللَّهَ عَزِيزٌ حَكِيمٌ﴾

२७.
आणि साऱ्या धरतीवरील वृक्षांच्या जर लेखण्या होतील आणि सारे समुद्र शाई बनतील आणि त्यांच्यानंतर सात समुद्र दुसरे असतील तरीही अल्लाहची प्रशंसा संपू शकत नाही. निःसंशय, अल्लाह मोठा वर्चस्वशाली आणि हिकमत (बुद्धिकुशलता) बाळगणारा आहे.

﴿مَا خَلْقُكُمْ وَلَا بَعْثُكُمْ إِلَّا كَنَفْسٍ وَاحِدَةٍ ۗ إِنَّ اللَّهَ سَمِيعٌ بَصِيرٌ﴾

२८. तुम्ही सर्वांना निर्माण करणे आणि मेल्यानंतर पुन्हा जिवंत करणे असेच आहे जसे एका जीवाला. निःसंशय, अल्लाह ऐकणारा, पाहणारा आहे.

﴿أَلَمْ تَرَ أَنَّ اللَّهَ يُولِجُ اللَّيْلَ فِي النَّهَارِ وَيُولِجُ النَّهَارَ فِي اللَّيْلِ وَسَخَّرَ الشَّمْسَ وَالْقَمَرَ كُلٌّ يَجْرِي إِلَىٰ أَجَلٍ مُسَمًّى وَأَنَّ اللَّهَ بِمَا تَعْمَلُونَ خَبِيرٌ﴾

२९. किंवा तुम्ही नाही पाहत की अल्लाह रात्रीला, दिवसात आणि दिवसाला रात्रीत दाखल करतो.
सूर्य आणि चंद्राला त्यानेच आज्ञाधारक बनवून ठेवले आहे की प्रत्येक निर्धारित वेळेपर्यंत चालत राहावा तुम्ही जे काही कर्म करता, अल्लाह ते प्रत्येक कर्म जाणतो.

﴿ذَٰلِكَ بِأَنَّ اللَّهَ هُوَ الْحَقُّ وَأَنَّ مَا يَدْعُونَ مِنْ دُونِهِ الْبَاطِلُ وَأَنَّ اللَّهَ هُوَ الْعَلِيُّ الْكَبِيرُ﴾

३०.
हे सर्व (व्यवस्था) या कारणास्तव आहे की अल्लाह सत्य आहे, आणि त्याच्याखेरीज ज्यांना लोक (उपास्य समजून) पुकारतात, सर्व खोटे (मिथ्या) आहेत, आणि निःसंशय अल्लाह अतिउच्च आणि मोठा महान आहे.

﴿أَلَمْ تَرَ أَنَّ الْفُلْكَ تَجْرِي فِي الْبَحْرِ بِنِعْمَتِ اللَّهِ لِيُرِيَكُمْ مِنْ آيَاتِهِ ۚ إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَاتٍ لِكُلِّ صَبَّارٍ شَكُورٍ﴾

३१.
काय तुम्ही या गोष्टीवर विचार नाही करीत की पाण्यात नौका अल्लाहच्या कृपा-देणगीने चालत आहेत, यासाठी की त्याने तुम्हाला आपल्या निशाण्या दाखवाव्यात. निश्चितच यात प्रत्येक सबुरी राखणाऱ्या आणि कृतज्ञशील असणाऱ्याकरिता अनेक निशाण्या आहेत.

﴿وَإِذَا غَشِيَهُمْ مَوْجٌ كَالظُّلَلِ دَعَوُا اللَّهَ مُخْلِصِينَ لَهُ الدِّينَ فَلَمَّا نَجَّاهُمْ إِلَى الْبَرِّ فَمِنْهُمْ مُقْتَصِدٌ ۚ وَمَا يَجْحَدُ بِآيَاتِنَا إِلَّا كُلُّ خَتَّارٍ كَفُورٍ﴾

३२.
आणि जेव्हा त्यांच्यावर लाटा, त्या सावल्यांप्रमाणे आच्छादित होतात तेव्हा ते (मोठा) विश्वास बाळगून अल्लाहलाच पुकारतात, आणि जेव्हा अल्लाह त्यांना त्यातून सोडवून खुष्कीकडे पोहचवितो, तेव्हा त्यांच्यापैकी काही संतुलित राहतात, आणि आमच्या आयतींचा इन्कार केवळ तेच लोक करतात, जे वचन भंग करणारे आणि कृतघ्न असतील.

﴿يَا أَيُّهَا النَّاسُ اتَّقُوا رَبَّكُمْ وَاخْشَوْا يَوْمًا لَا يَجْزِي وَالِدٌ عَنْ وَلَدِهِ وَلَا مَوْلُودٌ هُوَ جَازٍ عَنْ وَالِدِهِ شَيْئًا ۚ إِنَّ وَعْدَ اللَّهِ حَقٌّ ۖ فَلَا تَغُرَّنَّكُمُ الْحَيَاةُ الدُّنْيَا وَلَا يَغُرَّنَّكُمْ بِاللَّهِ الْغَرُورُ﴾

३३.
लोकांनो! आपल्या पालनकर्त्याचे भय राखा आणि त्या दिवसाचे भय ठेवा, ज्या दिवशी पिता आपल्या पुत्राला कसलाही लाभ पोहचवू शकणार नाही आणि ना पुत्र आपल्या पित्यास किंचितही लाभ पोहचविणारा असेल. लक्षात ठेवा! अल्लाहचा वायदा सच्चा आहे. पाहा! तुम्हाला ऐहिक जीवनाने धोक्यात टाकू नये आणि ना धोकेबाज (सैताना) ने तुम्हाला धोक्यात टाकावे.

﴿إِنَّ اللَّهَ عِنْدَهُ عِلْمُ السَّاعَةِ وَيُنَزِّلُ الْغَيْثَ وَيَعْلَمُ مَا فِي الْأَرْحَامِ ۖ وَمَا تَدْرِي نَفْسٌ مَاذَا تَكْسِبُ غَدًا ۖ وَمَا تَدْرِي نَفْسٌ بِأَيِّ أَرْضٍ تَمُوتُ ۚ إِنَّ اللَّهَ عَلِيمٌ خَبِيرٌ﴾

३४. निःसंशय, अल्लाहच्याच जवळ कयामतचे ज्ञान आहे. तोच पर्जन्यवृष्टी करतो, आणि मातेच्या गर्भात जे काही आहे ते जाणतो. कोणीही जाणत नाही की उद्या काय कमवील? ना कोणाला हे माहीत आहे की तो कोणत्या भूमीवर मरण पावेल.१ लक्षात ठेवा, अल्लाहच संपूर्ण ज्ञान बाळगणारा आणि सत्य जाणणारा आहे.

الترجمات والتفاسير لهذه السورة: