الواحد
كلمة (الواحد) في اللغة لها معنيان، أحدهما: أول العدد، والثاني:...
२. काय लोकांनी असे समजून घेतले आहे की त्यांच्या केवळ या बोलण्यावर की आम्ही ईमान राखले आहे, त्यांना परीक्षा घेतल्याविना असेच सोडून दिले जाईल?१
३. त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांचीही आम्ही चांगल्या प्रकारे कसोटी घेतली. निःसंशय, अल्लाह त्यांनाही जाणून घेईल, जे खरे बोलतात, आणि त्यांनाही जाणून घेईल जे खोटारडे आहेत.
४. काय जे लोक दुष्कर्म करीत आहेत, त्यांनी असे समजून घेतले आहेत की ते आमच्या काबूतून बाहेर जातील? कसा वाईट विचार हे लोक करीत आहेत!
५. ज्याला अल्लाहच्या भेटीची अपेक्षा असेल, तर अल्लाहची निर्धारित केलेली वेळ निश्चितच येणार आहे. तो सर्व काही ऐकणारा, सर्व काही जाणणारा आहे.
६. आणि प्रत्येक प्रयत्न करणारा आपल्या स्वतःच्याच भल्याकरिता प्रयत्न करतो. निःसंशय अल्लाह समस्त जगवाल्यांपासून निःस्पृह आहे. १
७.
आणि ज्यांनी ईमान बाळगले आणि (पैगंबर आचरणच्या दृष्टीने) सत्कर्म केले, आम्ही त्यांच्या सर्व अपराधांना त्यांच्यापासून दूर करू, आणि त्यांच्या नेक कामांचा चांगला मोबदला प्रदान करू.
८. आम्ही प्रत्येक माणसाला आपल्या माता-पित्याशी सद्वर्तन करण्याची शिकवण दिली आहे. तथापि जर ते हा प्रयत्न करतील की तुम्ही माझ्यासोबत त्याला सहभागी करून घ्यावे, ज्याचे तुम्हाला ज्ञान नाही तर त्यांचे म्हणणे मान्य करू नका. तुम्हा सर्वांना परतून माझ्याचकडे यायचे आहे, मग मी त्या प्रत्येक गोष्टीशी, जी तुम्ही करीत होते अवगत करवीन.
९. आणि ज्या लोकांनी ईमान कबूल केले, आणि सत्मर्क करीत राहिले त्यांना आम्ही आपल्या नेक (सदाचारी) दासांमध्ये सामील करू.
१०. आणि काही लोक असेही आहेत, जे तोंडाने म्हणतात की आम्ही ईमान राखले आहे.
परंतु जेव्हा अल्लाहच्या मार्गात एखाद्या दुःखाचा सामना होतो, तेव्हा लोकांकडून दिला जाणाऱ्या कष्ट- यातनेला अल्लाहच्या शिक्षा- यातनेसमान ठरवितात, परंतु जर अल्लाहची मदत येऊन पोहचली तर तेव्हा म्हणू लागतात की आम्ही तर तुमच्याच साथीला आहोत, काय समस्त विश्वा (माणसांच्या) मनात जे काही आहे, ते अल्लाह जाणत नाही?
११.
आणि ज्या लोकांनी ईमान राखले, अल्लाह त्यांनाही जाणून घेतल्याविना राहणार नाही आणि ईमानधारक असण्याचे ढोंग रचणाऱ्यांनाही जाणून घेतल्याविना राहणार नाही.
१२.
आणि काफिर (सत्य विरोधक) ईमान राखणाऱ्यांना म्हणाले, तुम्ही आमच्या मार्गाचे अनुसरण करा, तुमचे अपराध आम्ही आपल्या (शिरा) वर घेऊ, वास्तविक ते त्यांच्या अपराधांपैकी काही एक आपल्यावर घेणार नाहीत. ते तर अगदी खोटारडे आहेत.
१३. (एवढे निश्चित की) हे आपले ओझे उचलतील आणि आपल्या ओझ्यांसोबत इतर ओझे देखील, आणि ते जे काही असत्य रचत आहेत त्या सर्वांबाबत त्यांना विचारणा केली जाईल.
१४. आणि आम्ही नूह (अलै.) ला त्यांच्या जनसमूहाकडे पाठविले, ते त्यांच्या दरम्यान साडे नऊशे वर्षांपर्यंत राहिले, मग त्यांना वादळाने येऊन धरले आणि ते होतेच मोठे अत्याचारी.
१५. मग आम्ही त्यांना आणि नौकावाल्यांना मुक्ती दिली, आणि आम्ही या घटनेला संपूर्ण जगाकरिता बोधचिन्ह बनविले.
१६. आणि इब्राहीम (अलै.) देखील आपल्या जनसमूहास म्हणाले की अल्लाहची उपासना करा आणि त्याचे भय बाळगून राहा, जर तुम्ही अक्कलवान असाल तर, हेच तुमच्यासाठी अधिक चांगले आहे.
१७. तुम्ही तर अल्लाहला सोडून मूर्तीची पूजा करीत आहात, आणि खोट्या गोष्टी मनाने रचून घेता.
(ऐका) तुम्ही अल्लाहऐवजी ज्यांची ज्यांची पूजा अर्चना करीत आहात, ते तर तुमच्या आजिविकेचे मालक नाहीत, तेव्हा तुम्ही अल्लाहकडेच रोजी (आजिविका) मागितली पाहिजे. आणि त्याचीच उपासना करा आणि त्याच्याशीच कृतज्ञशील राहा आणि त्याच्याचकडे तुम्ही परतविले जाल.
१८. आणि जर तुम्ही खोटे ठरवाल तर तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनीही खोटे ठरविले आहे, आणि पैगंबराचे कर्तव्य तर केवळ स्पष्टरित्या पोहचवून देणेच आहे.
१९. काय त्यांनी नाही पाहिले की अल्लाहने सृष्टी-निर्मितीची उत्पत्ती कशा प्रकारे केली, मग अल्लाह तिची पुनरावृत्ती करील. हे तर अल्लाहकरिता फार सोपे आहे.
२०. सांगा, जमिनीवर हिंडून फिरून पाहा की कशा प्रकारे अल्लाहने सर्वांत प्रथम निर्मितीला उत्पन्न केले, मग अल्लाहच दुसरी नवी उत्पत्ती करेल. निःसंशय, अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो.
२१. तो ज्याला इच्छिल अज़ाब देईल आणि ज्यावर इच्छिल दया करील, सर्व त्याच्याचकडे परतविले जाल.
२२. तुम्ही ना जमिनीवर अल्लाहला विवश (लाचार) करू शकता, ना आकाशात, अल्लाहखेरीज तुमचा कोणी ना संरक्षक आहे ना सहाय्यक.
२३.
आणि जे लोक अल्लाहच्या आयतींना आणि त्याच्या भेटीला खोटे ठरवितात त्यांनी माझ्या दया- कृपेची आस राखू नये आणि त्याच्याकरिता दुःखदायक अज़ाब (शिक्षा- यातना) आहे.
२४. त्याच्या जनसमूहाचे उत्तर याखेरीज दुसरे काही नव्हते की ते म्हणाले, याला मारून टाका किंवा याला जाळून टाका. शेवटी अल्लाहने त्यांना आगीपासून वाचविले. यात ईमान राखणाऱ्यांकरिता अनेक निशाण्या आहेत.
२५. (हजरत इब्राहीम अलै.) म्हणाले की तुम्ही अल्लाहऐवजी ज्या मूर्ती (दैवतां) ची पूजा अर्चना केली आहे त्यांना तुम्ही आपल्या ऐहिक मैत्रीचे कारण बनविले आहे.
तुम्ही सर्व कयामतच्या दिवशी एकमेकांचा इन्कार करू लागाल आणि एकमेकांना धिःक्कारू लागाल आणि तुम्हा सर्रांचे ठिकाण जहन्नमध्ये असेल, आणि कोणी तुमची मदत करणाराही नसेल.
२६. तेव्हा त्याच्या (हजरत इब्राहीम अलै.) वर (हजरत) लूत (अलै.) यांनी ईमान राखले आणि म्हणाले, मी आपल्या पालनकर्त्याकडे हिजरत (स्थलांतर) करणारा आहे. तो मोठा वर्चस्वशाली आणि हिकमत (बुद्धी-कौशल्य) बाळगणारा आहे.
२७. आणि आम्ही त्याला (इब्राहीम अलै.
यांना) इसहाक आणि याकूब प्रदान केले, आणि आम्ही प्रेषित्व आणि ग्रंथ त्यांच्या वंशात राखला, आणि आम्ही या जगातही त्यांना चांगला मोबदला दिला आणि आखिरतमध्ये तर ते सदाचारी लोकांपैकी आहेत.
२८. आणि (हजरत) लूत (अलै.) यांचाही (उल्लेख करा) जेव्हा ते आपल्या जनसमूहाला म्हणाले की तुम्ही तर असे निर्लज्जपणाचे काम करता जे तुमच्यापूर्वी संपूर्ण जगापैकी कोणीही केले नाही.
२९.
काय तुम्ही (कामवासना पूर्तीकरिता) पुरुषांजवळ येता, आणि वाटमार करतात आणि आपल्या आम सभामध्ये निर्लज्जतेचे काम करता? तेव्हा त्याच्या उत्तरादाखल त्यांच्या जनसमूहाने याखेरीज दुसरे काही सांगितले नाही की पुरे कर, जर सच्चा आहेस तर आमच्यावर अल्लाहचा अज़ाब (शिक्षा) आणून दाखव.
३०. (हजरत) लूत (अलै.) यांनी दुआ (प्रार्थना) केली की, हे माझ्या पालनकर्त्या! या दुराचारी लोकांच्या विरोधात माझी मदत कर.
३१. आणि जेव्हा आम्ही पाठविलेले फरिश्ते (हजरत) इब्राहीम (अलै.) जवळ शुभ समाचार घेऊन पोहोचले तेव्हा म्हणाले, आम्ही या वस्तीच्या लोकांचा नाश करणार आहोत. निःसंशय इथले रहिवाशी मोठे अत्याचारी आहेत.
३२. (हजरत) इब्राहीम) म्हणाले, त्या वस्तीत तर लूत (अलै.) आहेत. फरिश्ते म्हणाले, इथे जे आहेत, त्यांना आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो लूत आणि त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या पत्नीखेरीज, आम्ही वाचवू. निःसंशय ती स्त्री मागे राहणाऱ्यांपैकी आहे.
३३. आणि मग जेव्हा आम्ही पाठविलेले फरिश्ते लूत (अलै.) जवळ पोहोचले, तेव्हा ते त्यांच्यामुळे दुःखी कष्टी झाले आणि मनातल्या मनात शोकाकुल झाले.
संदेशवाहक म्हणाले, तुम्ही भिऊ नका आणि दुःखी होऊ नका, आम्ही तुम्हाला तुमच्या कुटुंबासहित सुरक्षित ठेवू तुमच्या पत्ीला सोडून, कारण ती अज़ाब (शिक्षे) साठी बाकी राहणाऱ्यांपैकी असेल.
३४. आम्ही या वस्तीच्या लोकांवर आकाशातून अज़ाब उतरविणार आहोत, या कारणास्तव की हे दुराचारी होत आहेत.
३५. आणि आम्ही या वस्तीला स्पष्ट बोध ग्रहण करण्यासाठी चिन्ह बनविले त्या लोकांकरिता जे बुद्धी बाळगतात.
३६. आणि मदयनकडे (आम्ही) त्यांचे भाऊ शुऐब (अलै.) यांना पाठविले. ते म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! अल्लाहची उपासना करा, कयामतच्या दिवसाची आशा बाळगा आणि जमिनीवर उत्पात (फसाद) पसरवित फिरू नका.
३७. तरीही त्या लोकांनी त्यांना खोटे ठरविले, शेवटी भूकंपाने त्यांना धरले आणि ते आपल्या घरांमध्ये बसल्या बसल्या मृत झाले.
३८. आणि आम्ही ‘आद’ आणि ‘समूद’ (जनसमूहा) च्या लोकांनाही (नष्ट केले) ज्यांचे काही भग्न अवशेष तुमच्यासमोर हजर आहेत. आणि सैतानाने त्यांच्या दुष्कर्माला सुशोभित करून दाखविले होते आणि त्यांना सन्मार्गापासून रोखले होते. यानंतर की हे डोळे राखणारे आणि चलाख होते.
३९. आणि कारुन, फिरऔन आणि हामानला देखील. त्याच्याजवळ (हजरत) मूसा उघड स्वरूपाचे चमत्कार (मोजिजे) घेऊन आले होते तरीही त्यांनी धरतीवर घमेंड केली, तथापि आमच्या पुढे जाणारे होऊ शकले नाहीत.
४०. मग तर आम्ही प्रत्येकाला त्याच्या दुष्कर्माची शिक्षा देण्यासाठी धरले.
त्यांच्यापैकी काहींवर आम्ही दगडांचा वर्षाव केला, त्यांच्यापैकी काहींना भयंकर चित्काराने घेरले, त्यांच्यापैकी काहींना आम्ही जमिनीत धसवले आणि त्याच्यापैकी काहींना आम्ही पाण्यात बुडविले. अल्लाह असा नाही की त्यांच्यावर अत्याचार करील, उलट तेच लोक आपल्या प्राणांवर जुलूम अत्याचार करीत होते.
४१.
ज्या लोकांनी अल्लाहखेरीज दुसऱ्यांना वली (दैवत) ठरवून घेतले आहे, त्यांचे उदाहरण कोष्टी किटकासारखे आहे कारण तोही एक घर बनवितो, वास्तविक सर्व घरांपेक्षा जास्त कमजोर घर कोष्टी किटकाचे घर आहे. त्यांनी हे जाणून घेतले असते तर बरे झाले असते!
४२. अल्लाह समस्त वस्तूंना जाणतो, ज्यांना ते त्याच्याखेरीज पुकारत आहेत. आणि तो मोठा जबरदस्त आणि बुद्धी कौशल्य बाळगणारा आहे.
४३. आणि आम्ही ही उदाहरण लोकांकरिता निवेदन करीत आहोत आणि यांना केवळ तेच लोक समजतात जे ज्ञान राखतात.
४४. अल्लाहने आकाशांना आणि जमिनीला सत्यासह निर्माण केले आहे ईमान राखणाऱ्यांकरिता यात फार मोठी निशाणी आहे.
४५.
जो ग्रंथ तुमच्याकडे वहयी (अवतरित) केला गेला आहे, त्याचे पठण करा१ आणि नमाज कायम करा (नियमितपणे पढत राहा) निःसंशय नमाज, निर्लज्जता आणि दुष्कर्मापासून रोखते२ आणि निःसंशय अल्लाहचे नामःस्मरण फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही जे काही करीत आहात, अल्लाह ते जाणतो.
४६. आणि ग्रंथधारकांशी खूप चांगल्या रितीने वादविवाद करा, अशा लोकांखेरीज, जे त्यांच्यात अत्याचारी आहेत. आणि स्पष्ट ऐलान करा की आम्ही तर त्या ग्रंथावरही ईमान राखतो, जो आमच्यावर अवतरित केला गेला आहे आणि त्यावरही, जो तुमच्यावर अवतरित केला गेला. आमचा आणि तुमचा पालनकर्ता एकच आहे. आम्ही सर्व त्याचेच आज्ञाधारक आहोत.
४७.
आणि आम्ही त्याच प्रकारे तुमच्याकडे आपला ग्रंथ अवतरित केला आहे, यास्तव ज्यांना आम्ही ग्रंथ प्रदान केला आहे, ते त्यावर ईमान राखतात आणि त्यांच्यापैकी काही त्यावर ईमान राखतात आणि आमच्या आयतींचा इन्कार केवळ काफिरच करतात.
४८. आणि यापूर्वी तर तुम्ही एखादा ग्रंथ वाचत होते आणि ना एखादा ग्रंथ आपल्या हाताने लिहित होते की (ज्यामुळे) असत्याचे पुजारी शंका संशयात पडले असते.
४९. वास्तविक या (कुरआनाच्या) दिव्य (स्पष्ट) आयती आहेत, ज्या विद्वानांच्या हृदयात सुरक्षित आहेत. आमच्या आयतींचा इन्कार करणारा, अत्याचारीखेरीज दुसरा कोणी नाही.
५०. आणि ते म्हणाले, याच्यावर काही निशाण्या याच्या पालनकर्त्यातर्फे का नाही अवतरित केल्या गेल्या? (तुम्ही) सांगा, निशाण्या तर सर्व अल्लाहजवळ आहेत. माझी योग्यता तर केवळ स्पष्टतः खबरदार (सावध) करणाऱ्याची आहे.
५१. काय त्यांच्यासाठी हे निशाण पुरेसे नाही की आम्ही तुमच्यावर आपला ग्रंथ अवतरित केला, जो त्यांना वाचून ऐकविला जात आहे. यात (अल्लाहची) दया-कृपाही आहे आणि बोध उपदेशही, त्या लोकांसाठी जे ईमान राखणारे आहेत.
५२. त्यांना सांगा, माझ्या आणि तुमच्या दरम्यान अल्लाहचे साक्षी असणे पुरेसे आहे. तो तर आकाश आणि जमिनीच्या प्रत्येक वस्तूला जाणणारा आहे. जे लोक असत्याला मानणारे आहेत आणि अल्लाहशी कुप्र (इन्कार) करणारे आहेत, ते फार मोठ्या नुकसानात आहेत.
५३. आणि हे लोक तुमच्याजवळ शिक्षा-यातनेची घाई माजवित आहेत. जर माझ्यातर्फे एक निश्चित वेळ ठरविली गेली नसती तर आतापर्यंत त्यांच्याजवळ शिक्षा-यातना येऊन पोहचली असती. एवढे मात्र निश्चित की अचानक त्यांच्या नकळत अज़ाब त्यांच्याजवळ येऊन पोहोचेल.
५४. हे लोक अज़ाब (शिक्षे) साठी घाई माजवित आहेत, आणि (समाधान राखा) जहन्नम काफिरांना घेरून टाकणार आहे.
५५. त्या दिवशी त्यांना, त्यांच्या वरून आणि खालून अज़ाब झाकत असेल आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह फर्माविल, आता आपल्या दुष्कर्मांची गोडी चाखा.
५६. हे माझ्या ईमान राखणाऱ्या दासांनो! माझी जमीन फार विस्तृत आहे. तेव्हा तुम्ही माझीच उपासना करा.
५७. प्रत्येक जीवाला मृत्युची गोडी चाखायची आहे आणि तुम्ही सर्व आमच्याचकडे परतविले जाल.
५८.
आणि ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले, त्यांना आम्ही निश्चितपणे जन्नतच्या उंच महालांमध्ये जागा देऊ, ज्यांच्या खालून नद्या वाहत आहे, जिथे ते सदैवकाळ राहतील. (चांगले) कर्म करणाऱ्यांचा किती चांगला मोबदला आहे!
५९. ते, ज्यांनी धीर - संयम राखला आणि जे आपल्या पालनकर्त्यावर भरवसा ठेवतात.
६०. आणि कित्येक प्राणी असे आहेत, जे आपली आजिविका उचलून फिरत नाही. त्या सर्वांना आणि तुम्हालाही अल्लाहच आजिविका प्रदान करतो. तो सर्व काही ऐकणारा, जाणणारा आहे.
६१.
आणि जर तुम्ही त्यांना विचाराल की आकाश व जमिनीचा निर्माण करणारा आणि सूर्य व चंद्राला कामास लावणारा कोण आहे, तर ते हेच उत्तर देतील की अल्लाह! तेव्हा मग कोठे उलट जात आहात?
६२. अल्लाह आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो, अधिक आजिविका प्रदान करतो आणि ज्याला इच्छितो कमी. निःसंशय, अल्लाह प्रत्येक गोष्ट जाणणारा आहे.
६३.
आणि जर तुम्ही त्यांना विचाराल की आकाशातून पाण्याचा वर्षाव करून, जमिनीला तिच्या मृत्युनंतर जिवंत करणारा कोण आहे, तेव्हा निश्चितच त्यांचे उत्तर हेच असेल की अल्लाह! तुम्ही सांगा की समस्त स्तुती- प्रशंसा अल्लाहकरिताच आहे, किंबहुना त्यांच्यात अधिकांश लोक निर्बोध आहेत. (आकलन अककल राखत नाही)
६४. आणि या जगाचे जीवन तर केवळ मनोरंजन आणि खेळ क्रीडा आहे परंतु खरे जीवन तर आखिरतचे घर आहे. या लोकांनी हे जाणले असते तर बरे झाले असते!
६५.
जेव्हा हे लोक नौकेत स्वार होतात, तेव्हा अल्लाहलाच पुकारतात, त्याच्यासाठी उपासनेला खासकरून, मग जेव्हा तो त्यांना खुश्कीकडे सुरक्षित घेऊन येतो, तेव्हा लगेच शिर्क (अनेकईश्वरउपासना) करू लागतात.
६६. यासाठी की आम्ही केलेल्या उपकारांशी कृतघ्न व्हावे आणि लाभ घेत राहावा. आता लवकरच त्यांना कळून येईल.
६७. काय हे नाही पाहत की आम्ही हरमला शांतीचे स्तळ बनविले, वस्तुतः त्यांच्या जवळच्या इलाक्यातून लोक अपहृत केले जातात. काय हे असत्यावर तर विश्वास ठेवतात आणि अल्लाहच्या कृपा- देणग्यांवर कृतघ्नता दाखवितात?
६८. आणि त्याहून मोठा अत्याचारी कोण असेल, जो अल्लाहशी छोट्या गोष्टीचा संबंध जोडेल किंवा सत्य त्याच्याजवळ येऊन पोहचले असता, तो त्याला खोटे असल्याचे सांगेल. काय अशा काफिरांचे ठिकाण जहन्नममध्ये नसेल?
६९. आणि जे लोक आमच्या मार्गात दुःख सहन करतात, आम्ही त्यांना आपला मार्ग अवश्य दाखवू. निःसंशय, अल्लाह सत्कर्म करणाऱ्यांचा सोबती आहे.