الزخرف

تفسير سورة الزخرف

الترجمة الماراتية

मराठी

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ حم﴾

१. हा - मीम

﴿وَالْكِتَابِ الْمُبِينِ﴾

२. शपथ आहे या स्पष्ट ग्रंथाची.

﴿إِنَّا جَعَلْنَاهُ قُرْآنًا عَرَبِيًّا لَعَلَّكُمْ تَعْقِلُونَ﴾

३. आम्ही यास अरबी भाषेचा कुरआन बनविला आहे, यासाठी की तुम्ही समजून घ्यावे.

﴿وَإِنَّهُ فِي أُمِّ الْكِتَابِ لَدَيْنَا لَعَلِيٌّ حَكِيمٌ﴾

४. आणि निःसंशय, हा सुरक्षित ग्रंथात आहे आणि आमच्या निकट उच्च दर्जाचा आहे. बुद्धी-कौशल्यपूर्ण आहे.

﴿أَفَنَضْرِبُ عَنْكُمُ الذِّكْرَ صَفْحًا أَنْ كُنْتُمْ قَوْمًا مُسْرِفِينَ﴾

५. काय आम्ही या सदुपदेशाला तुमच्यापासून या कारणास्तव हटवावे की तुम्ही मर्यादा ओलांडणारे लोक आहात.

﴿وَكَمْ أَرْسَلْنَا مِنْ نَبِيٍّ فِي الْأَوَّلِينَ﴾

६. आणि आम्ही पूर्वीच्या जनसमूहांमध्येही अनेक पैगंबर पाठविले.

﴿وَمَا يَأْتِيهِمْ مِنْ نَبِيٍّ إِلَّا كَانُوا بِهِ يَسْتَهْزِئُونَ﴾

७. आणि जो देखील पैगंबर त्यांच्याजवळ आला, त्यांनी त्याची थट्टाच उडविली.

﴿فَأَهْلَكْنَا أَشَدَّ مِنْهُمْ بَطْشًا وَمَضَىٰ مَثَلُ الْأَوَّلِينَ﴾

८.
तेव्हा आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त शक्तिशाली लोकांना नष्ट करून टाकले आणि पूर्वीच्या लोकांची उदाहरणे दिली गेली आहेत.

﴿وَلَئِنْ سَأَلْتَهُمْ مَنْ خَلَقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ لَيَقُولُنَّ خَلَقَهُنَّ الْعَزِيزُ الْعَلِيمُ﴾

९.
आणि जर तुम्ही त्यांना विचाराल की आकाशांना व धरतीला कोणी निर्माण केले, तर निःसंशय त्यांचे उत्तर हेच असेल की, त्यांना सर्वांत जबरदस्त आणि सर्वाधिक ज्ञान बाळगणाऱ्या (अल्लाह) नेच निर्माण केले आहे.

﴿الَّذِي جَعَلَ لَكُمُ الْأَرْضَ مَهْدًا وَجَعَلَ لَكُمْ فِيهَا سُبُلًا لَعَلَّكُمْ تَهْتَدُونَ﴾

१०.
(तोच आहे) ज्याने तुमच्यासाठी जमिनीला बिछाईत (आणि अंथरुण) बनविले आणि तिच्यात तुमच्यासाठी रस्ते बनविले, यासाठी की तुम्ही मार्ग प्राप्त करून घ्यावा.

﴿وَالَّذِي نَزَّلَ مِنَ السَّمَاءِ مَاءً بِقَدَرٍ فَأَنْشَرْنَا بِهِ بَلْدَةً مَيْتًا ۚ كَذَٰلِكَ تُخْرَجُونَ﴾

११.
आणि त्यानेच आकाशातून एका अनुमानानुसार पर्जन्यवृष्टी केली तेव्हा आम्ही त्याद्वारे मृत शहराला जिवंत केले. याच प्रकारे तुम्ही बाहेर काढले जाल.

﴿وَالَّذِي خَلَقَ الْأَزْوَاجَ كُلَّهَا وَجَعَلَ لَكُمْ مِنَ الْفُلْكِ وَالْأَنْعَامِ مَا تَرْكَبُونَ﴾

१२.
आणि ज्याने सर्व वस्तूंच्या जोड्या१ बनविल्या आणि तुमच्या (वाहना) करिता नौका बनविल्या आणि चतुष्पाद पशु निर्माण केले, ज्यांच्यावर तुम्ही स्वार होता.

﴿لِتَسْتَوُوا عَلَىٰ ظُهُورِهِ ثُمَّ تَذْكُرُوا نِعْمَةَ رَبِّكُمْ إِذَا اسْتَوَيْتُمْ عَلَيْهِ وَتَقُولُوا سُبْحَانَ الَّذِي سَخَّرَ لَنَا هَٰذَا وَمَا كُنَّا لَهُ مُقْرِنِينَ﴾

१३.
यासाठी की तुम्ही त्यांच्या पाठीवर स्वार व्हावे आणि जेव्हा तुम्ही यांच्यावर व्यवस्थित बसाल, तेव्हा आपल्या पालनकर्त्याने (प्रदान केलेल्या) देणग्यांचे स्मरण करा आणि म्हणा, मोठा पवित्र आहे तो, ज्याने यास आमच्या अधीन केले, अन्यथा यास काबूत आणण्याची आमची ताकद नव्हती.

﴿وَإِنَّا إِلَىٰ رَبِّنَا لَمُنْقَلِبُونَ﴾

१४. आणि निश्चितपणे आम्ही आपल्या पालनकर्त्याकडे परतणार आहोत.

﴿وَجَعَلُوا لَهُ مِنْ عِبَادِهِ جُزْءًا ۚ إِنَّ الْإِنْسَانَ لَكَفُورٌ مُبِينٌ﴾

१५. आणि त्यांनी अल्लाहच्या काही दासांना त्याचा अंश बनवून घेतले. निःसंशय, मनुष्य, स्पष्टपणे कृतघ्न आहे.

﴿أَمِ اتَّخَذَ مِمَّا يَخْلُقُ بَنَاتٍ وَأَصْفَاكُمْ بِالْبَنِينَ﴾

१६. काय अल्लाहने आपल्या निर्मितीमधून कन्या, स्वतःसाठी राखल्यात आणि तुम्हाला पुत्रांनी सुशोभित केले?

﴿وَإِذَا بُشِّرَ أَحَدُهُمْ بِمَا ضَرَبَ لِلرَّحْمَٰنِ مَثَلًا ظَلَّ وَجْهُهُ مُسْوَدًّا وَهُوَ كَظِيمٌ﴾

१७.
जेव्हा त्यांच्यापैकी एखाद्याला त्या गोष्टींची खबर दिली जाते जिचे उदाहरण त्याने दयावान अल्लाहकरिता सांगितले आहे, तेव्हा त्याचा चेहरा काळवंडतो आणि तो दुःखी होतो.

﴿أَوَمَنْ يُنَشَّأُ فِي الْحِلْيَةِ وَهُوَ فِي الْخِصَامِ غَيْرُ مُبِينٍ﴾

१८.
किंवा, काय (अल्लाहची संतती मुली आहेत) ज्या दाग-दागिन्यांत वाढतात आणि भांडण-तंट्यात (आपले म्हणणे) स्पष्ट बोलू शकत नाहीत.

﴿وَجَعَلُوا الْمَلَائِكَةَ الَّذِينَ هُمْ عِبَادُ الرَّحْمَٰنِ إِنَاثًا ۚ أَشَهِدُوا خَلْقَهُمْ ۚ سَتُكْتَبُ شَهَادَتُهُمْ وَيُسْأَلُونَ﴾

१९. आणि त्यांनी दयावान (अल्लाह) ची उपासना करणाऱ्या फरिश्त्यांना स्त्री बनवून टाकले.
काय त्यांच्या निर्मितीच्या वेळी ते हजर होते? थ्यांची ही साक्ष लिहून घेतली जाईल आणि त्यांना त्यासंबंधी विचारणा केली जाईल.

﴿وَقَالُوا لَوْ شَاءَ الرَّحْمَٰنُ مَا عَبَدْنَاهُمْ ۗ مَا لَهُمْ بِذَٰلِكَ مِنْ عِلْمٍ ۖ إِنْ هُمْ إِلَّا يَخْرُصُونَ﴾

२०. आणि म्हणतात की अल्लाहने इच्छिले असते तर आम्ही त्यांची उपासना केली नसती. त्यांना त्याचे काहीच ज्ञान नाही. हे तर केवळ अटकळीच्या (खोट्या गोष्टी) बोलतात.

﴿أَمْ آتَيْنَاهُمْ كِتَابًا مِنْ قَبْلِهِ فَهُمْ بِهِ مُسْتَمْسِكُونَ﴾

२१. काय आम्ही यापूर्वी त्यांना (दुसरा) एखादा ग्रंथ प्रदान केला आहे ज्याला यांनी मजबूतपणे धरून ठेवले आहे?

﴿بَلْ قَالُوا إِنَّا وَجَدْنَا آبَاءَنَا عَلَىٰ أُمَّةٍ وَإِنَّا عَلَىٰ آثَارِهِمْ مُهْتَدُونَ﴾

२२.
(नव्हे) किंबहुना हे तर म्हणतात की आम्हाला आमचे वाडवडील एका धर्मावर आढळले, आणि आम्ही त्यांच्याच पदचिन्हांवर चालून सन्मार्ग प्राप्त केला आहे.

﴿وَكَذَٰلِكَ مَا أَرْسَلْنَا مِنْ قَبْلِكَ فِي قَرْيَةٍ مِنْ نَذِيرٍ إِلَّا قَالَ مُتْرَفُوهَا إِنَّا وَجَدْنَا آبَاءَنَا عَلَىٰ أُمَّةٍ وَإِنَّا عَلَىٰ آثَارِهِمْ مُقْتَدُونَ﴾

२३.
आणि अशाच प्रकारे तुमच्या पूर्वीही आम्ही, ज्या ज्या वस्तीत एखादा खबरदार करणारा पाठविला, तिथल्या सुखवस्तू लोकांनी हेच उत्तर दिले की आम्हाला आपले पूर्वज (वाडवडील) (एकाच पाऊलवाटेवर आणि) एका धर्मावर आढळले आणि आम्ही तर त्यांच्याच पदचिन्हांचे अनुसरण करणारे आहोत.

﴿۞ قَالَ أَوَلَوْ جِئْتُكُمْ بِأَهْدَىٰ مِمَّا وَجَدْتُمْ عَلَيْهِ آبَاءَكُمْ ۖ قَالُوا إِنَّا بِمَا أُرْسِلْتُمْ بِهِ كَافِرُونَ﴾

२४.
(पैगंबराने) सांगितलेही की जरी मी त्याहून अधिक चांगल्या (ध्येयापर्यंत पोहचविणारा) मार्ग घेऊन आलो आहे, ज्यावर तुम्हाला आपले वाडवडील आढळले (तरीही तुम्ही त्यांचेच अनुसरण कराल?) तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, आम्ही ते मान्य करणार नाहीत, जे देऊन तुम्हाला पाठविले गेले आहे.

﴿فَانْتَقَمْنَا مِنْهُمْ ۖ فَانْظُرْ كَيْفَ كَانَ عَاقِبَةُ الْمُكَذِّبِينَ﴾

२५. तेव्हा आम्ही त्यांचा सूड घेतला आणि पाहा, खोटे ठरविणाऱ्यांचा काय परिणाम (अंत) झाला!

﴿وَإِذْ قَالَ إِبْرَاهِيمُ لِأَبِيهِ وَقَوْمِهِ إِنَّنِي بَرَاءٌ مِمَّا تَعْبُدُونَ﴾

२६. आणि जेव्हा इब्राहीम (अलै.
) आपल्या पित्यास आणि आपल्या जनसमूहाच्या लोकांना म्हणाले, मी त्या गोष्टींपासून अलग आहे, ज्यांची तुम्ही उपासना करता.

﴿إِلَّا الَّذِي فَطَرَنِي فَإِنَّهُ سَيَهْدِينِ﴾

२७. त्या शक्ती-सामर्थ्याखेरीज, ज्याने मला निर्माण केले आहे आणि तोच मला मार्गदर्शनही करेल.

﴿وَجَعَلَهَا كَلِمَةً بَاقِيَةً فِي عَقِبِهِ لَعَلَّهُمْ يَرْجِعُونَ﴾

२८. आणि इब्राहीम (अलै.
) तिलाच आपल्या संततीलाही बाकी राहणारी गोष्ट कायम करून गेले, यासाठी की लोकांनी (अनेकेश्वरउपासनेपासून) आपला बचाव करीत राहावे.

﴿بَلْ مَتَّعْتُ هَٰؤُلَاءِ وَآبَاءَهُمْ حَتَّىٰ جَاءَهُمُ الْحَقُّ وَرَسُولٌ مُبِينٌ﴾

२९.
किंबहुना मी त्या लोकांना आणि त्यांच्या पूर्वजांना सामुग्री (आणि साधन) प्रदान केली, येथपावेतो की त्यांच्याजवळ सत्य आणि स्पष्टरित्या ऐकविणारा रसूल (पैगंबर) आला.

﴿وَلَمَّا جَاءَهُمُ الْحَقُّ قَالُوا هَٰذَا سِحْرٌ وَإِنَّا بِهِ كَافِرُونَ﴾

३०. आणि सत्य येऊन पोहोचताच हे उद्‌गारले की ही तर जादू आहे, आणि आम्ही याचा इन्कार करणारे आहोत.

﴿وَقَالُوا لَوْلَا نُزِّلَ هَٰذَا الْقُرْآنُ عَلَىٰ رَجُلٍ مِنَ الْقَرْيَتَيْنِ عَظِيمٍ﴾

३१. आणि म्हणू लागले की हा कुरआन या दोन्ही वस्त्यांपैकी एखाद्या सुखसंपन्न माणसावर का अवतरित केला गेला नाही?

﴿أَهُمْ يَقْسِمُونَ رَحْمَتَ رَبِّكَ ۚ نَحْنُ قَسَمْنَا بَيْنَهُمْ مَعِيشَتَهُمْ فِي الْحَيَاةِ الدُّنْيَا ۚ وَرَفَعْنَا بَعْضَهُمْ فَوْقَ بَعْضٍ دَرَجَاتٍ لِيَتَّخِذَ بَعْضُهُمْ بَعْضًا سُخْرِيًّا ۗ وَرَحْمَتُ رَبِّكَ خَيْرٌ مِمَّا يَجْمَعُونَ﴾

३२.
काय तुमच्या पालनकर्त्याच्या दया-कृपेची हे विभागणी करतात? आम्हीच त्यांच्या ऐहिक जीवनाची (आजिविका) त्यांच्यात वाटून दिली आहे आणि एकाला दुसऱ्याहून अधिक चांगले केले आहे यासाठी की एकमेकांना अधीन करून घ्यावे आणि ज्याला हे लोक जमा करीत फिरत आहेत, त्याहून तुमच्या पालनकर्त्याची दया - कृपा अतिशय उत्तम आहे.

﴿وَلَوْلَا أَنْ يَكُونَ النَّاسُ أُمَّةً وَاحِدَةً لَجَعَلْنَا لِمَنْ يَكْفُرُ بِالرَّحْمَٰنِ لِبُيُوتِهِمْ سُقُفًا مِنْ فِضَّةٍ وَمَعَارِجَ عَلَيْهَا يَظْهَرُونَ﴾

३३.
आणि जर अशी गोष्ट नसती की सर्व लोक एकाच पद्धतीचे अनुसरण करतील तर दयावान (रहमान) शी कुप्र (इन्कार) करणाऱ्यांच्या घरांची छते आम्ही चांदीची बनविली असती आणि जिने (पायऱ्या) देखील, ज्यावर ते चढतात.

﴿وَلِبُيُوتِهِمْ أَبْوَابًا وَسُرُرًا عَلَيْهَا يَتَّكِئُونَ﴾

३४. आणि त्यांच्या घरांचे दरवाजे व आसने देखील, ज्यावर ते तक्के (लोड) लावून बसतात.

﴿وَزُخْرُفًا ۚ وَإِنْ كُلُّ ذَٰلِكَ لَمَّا مَتَاعُ الْحَيَاةِ الدُّنْيَا ۚ وَالْآخِرَةُ عِنْدَ رَبِّكَ لِلْمُتَّقِينَ﴾

३५.
आणि सोन्याचेही, आणि हा सर्व काही या जगाचाच लाभ आहे, आणि आखिरत तर तुमच्या पालनकर्त्याच्या निकट केवळ नेक सदाचारी लोकांकरिताच आहे.

﴿وَمَنْ يَعْشُ عَنْ ذِكْرِ الرَّحْمَٰنِ نُقَيِّضْ لَهُ شَيْطَانًا فَهُوَ لَهُ قَرِينٌ﴾

३६. आणि जो मनुष्य अल्लाहच्या स्मरणापासून सुस्ती करील, आम्ही त्याच्यावर एक सैतान निर्धारित करतो. तोच त्याचा साथीदार बनतो.

﴿وَإِنَّهُمْ لَيَصُدُّونَهُمْ عَنِ السَّبِيلِ وَيَحْسَبُونَ أَنَّهُمْ مُهْتَدُونَ﴾

३७.
आणि ते त्यांना (अल्लाहच्या) मार्गापासून रोखतात आणि हे याच विचारात राहतात की आम्ही मार्गदर्शन प्राप्त केलेले आहोत.

﴿حَتَّىٰ إِذَا جَاءَنَا قَالَ يَا لَيْتَ بَيْنِي وَبَيْنَكَ بُعْدَ الْمَشْرِقَيْنِ فَبِئْسَ الْقَرِينُ﴾

३८.
येथेपर्यंत की जेव्हा तो आमच्याजवळ येईल, तेव्हा म्हणेल की माझ्या आणि तुझ्या दरम्यान पूर्व आणि पश्चिमेचे अंतर असते तर फार बरे झाले असते. तू मोठा वाईट सोबती आहेस.

﴿وَلَنْ يَنْفَعَكُمُ الْيَوْمَ إِذْ ظَلَمْتُمْ أَنَّكُمْ فِي الْعَذَابِ مُشْتَرِكُونَ﴾

३९.
आणि जेव्हा तुम्ही अत्याचार करूनच बसाल तर तुम्हाला आज कधीही तुम्हा सर्वांच्या शिक्षा - यातनेत सहभागी होणे काहीच लाभदायक ठरणार नाही.

﴿أَفَأَنْتَ تُسْمِعُ الصُّمَّ أَوْ تَهْدِي الْعُمْيَ وَمَنْ كَانَ فِي ضَلَالٍ مُبِينٍ﴾

४०.
तेव्हा काय तुम्ही बहिऱ्याला ऐकवू शकता किंवा आंधळ्याला मार्ग दाखवू शकता आणि त्याला जो उघड मार्गभ्रष्टतेत असावा.

﴿فَإِمَّا نَذْهَبَنَّ بِكَ فَإِنَّا مِنْهُمْ مُنْتَقِمُونَ﴾

४१. मग जर आम्ही तुम्हाला येथून जरी नेले तरीही आम्ही त्यांच्याशी सूड घेणारच आहोत.

﴿أَوْ نُرِيَنَّكَ الَّذِي وَعَدْنَاهُمْ فَإِنَّا عَلَيْهِمْ مُقْتَدِرُونَ﴾

४२. किंवा जो काही वायदा त्यांच्याशी केला आहे, तो तुम्हाला दाखवू आम्ही त्यांच्यावरही सामर्थ्य बाळगतो.

﴿فَاسْتَمْسِكْ بِالَّذِي أُوحِيَ إِلَيْكَ ۖ إِنَّكَ عَلَىٰ صِرَاطٍ مُسْتَقِيمٍ﴾

४३. तेव्हा जी वहयी (प्रकाशना) तुमच्याकडे केली गेली आहे तिला दृढपणे बाळगून राहा. निःसंशय, तुम्ही सरळ मार्गावर आहात.

﴿وَإِنَّهُ لَذِكْرٌ لَكَ وَلِقَوْمِكَ ۖ وَسَوْفَ تُسْأَلُونَ﴾

४४.
आणि निःसंशय, हा (स्वतः) तुमच्याकरिता आणि तुमच्या जनसमूहाकरिता उपदेश आहे आणि निकट भविष्यात तुमची विचारणा होईल.

﴿وَاسْأَلْ مَنْ أَرْسَلْنَا مِنْ قَبْلِكَ مِنْ رُسُلِنَا أَجَعَلْنَا مِنْ دُونِ الرَّحْمَٰنِ آلِهَةً يُعْبَدُونَ﴾

४५.
आणि आमच्या त्या पैगंबरांकडून माहीत करून घ्या, ज्यांना आम्ही तुमच्या पूर्वी पाठविले होते की काय आम्ही रहमान (दयावान अल्लाह) च्या खेरीज दुसरी उपास्ये (आराध्य दैवते) निर्धारित केली होती, ज्यांची उपासना केली जावी.

﴿وَلَقَدْ أَرْسَلْنَا مُوسَىٰ بِآيَاتِنَا إِلَىٰ فِرْعَوْنَ وَمَلَئِهِ فَقَالَ إِنِّي رَسُولُ رَبِّ الْعَالَمِينَ﴾

४६. आणि आम्ही मूसा (अलै.
) ला आपल्या निशाण्यास देऊन, फिरऔन आणि त्याच्या दरबारी लोकांजवळ पाठविले, तेव्हा (मूसा, त्यांना) म्हणाले की मी समस्त विश्वांच्या पालनकर्त्याचा रसूल (संदेशवाहक) आहे.

﴿فَلَمَّا جَاءَهُمْ بِآيَاتِنَا إِذَا هُمْ مِنْهَا يَضْحَكُونَ﴾

४७. तर जेव्हा ते आमच्या निशाण्या घेऊन त्या लोकांजवळ आले, तेव्हा ते अचानक त्यांची थट्टा उडवू लागले.

﴿وَمَا نُرِيهِمْ مِنْ آيَةٍ إِلَّا هِيَ أَكْبَرُ مِنْ أُخْتِهَا ۖ وَأَخَذْنَاهُمْ بِالْعَذَابِ لَعَلَّهُمْ يَرْجِعُونَ﴾

४८.
आणि आम्ही जी निशाणी त्यांना दाखवित होतो, ती दुसऱ्या निशाणीपेक्षा सरस असे, आणि आम्ही त्यांना शिक्षा - यातनेत धरले, यासाठी की त्यांनी रुजू करावे.

﴿وَقَالُوا يَا أَيُّهَ السَّاحِرُ ادْعُ لَنَا رَبَّكَ بِمَا عَهِدَ عِنْدَكَ إِنَّنَا لَمُهْتَدُونَ﴾

४९.
आणि ते म्हणाले, हे जादूगार! आमच्यासाठी आपल्या पालनकर्त्याला त्या गोष्टीची दुआ-प्रार्थना कर जिचा त्याने तुला वायदा दिलेला आहे विश्वास कर की आम्ही सर्न्माला लागू.

﴿فَلَمَّا كَشَفْنَا عَنْهُمُ الْعَذَابَ إِذَا هُمْ يَنْكُثُونَ﴾

५०.
मग जेव्हा आम्ही त्यांच्यावरून तो अज़ाब हटविला तेव्हा त्यांनी त्याच वेळी आपला वायदा व आपल्या वचनाचा भंग केला.

﴿وَنَادَىٰ فِرْعَوْنُ فِي قَوْمِهِ قَالَ يَا قَوْمِ أَلَيْسَ لِي مُلْكُ مِصْرَ وَهَٰذِهِ الْأَنْهَارُ تَجْرِي مِنْ تَحْتِي ۖ أَفَلَا تُبْصِرُونَ﴾

५१.
आणि फिरऔनने आपल्या जनसमूहात ऐलान करविले व म्हणाला, हे माझ्या जमातीच्या लोकानो! काय मिस्रचा देश माझा नाही, आणि माझ्या राजमहालांच्या खाली जे हे जलप्रवाह वाहत आहेत, काय तुम्ही पाहात नाही?

﴿أَمْ أَنَا خَيْرٌ مِنْ هَٰذَا الَّذِي هُوَ مَهِينٌ وَلَا يَكَادُ يُبِينُ﴾

५२. किंबहुना मी श्रेष्ठतम आहे याच्या तुलनेत जो तुच्छ आहे आणि साफ (स्पष्टपणे) बोलूही शकत नाही.

﴿فَلَوْلَا أُلْقِيَ عَلَيْهِ أَسْوِرَةٌ مِنْ ذَهَبٍ أَوْ جَاءَ مَعَهُ الْمَلَائِكَةُ مُقْتَرِنِينَ﴾

५३.
बरे, याच्यावर सोन्याची कांकणे का नाही अवतरित झालीत, किंवा याच्यासोबत फरिश्तेच झुंडीने (गोळा होऊन) आले असते.

﴿فَاسْتَخَفَّ قَوْمَهُ فَأَطَاعُوهُ ۚ إِنَّهُمْ كَانُوا قَوْمًا فَاسِقِينَ﴾

५४. तेव्हा त्याने आपल्या जनसमूहाच्या लोकांना मूर्ख बनविले आणि त्यांनी त्याचे म्हणणे मानले. निःसंशय, ते सर्व दुराचारी लोक होते.

﴿فَلَمَّا آسَفُونَا انْتَقَمْنَا مِنْهُمْ فَأَغْرَقْنَاهُمْ أَجْمَعِينَ﴾

५५.
मग जेव्हा त्यांनी आम्हाला क्रोधित केले, तेव्हा आम्ही त्यांचा सूड घेतला आणि सर्वांना (समुद्रात) बुडवून टाकले.

﴿فَجَعَلْنَاهُمْ سَلَفًا وَمَثَلًا لِلْآخِرِينَ﴾

५६. तेव्हा आम्ही त्यांना भूतकालीन करून टाकले आणि नंतरच्या लोकांकरिता नमूना बनविले.

﴿۞ وَلَمَّا ضُرِبَ ابْنُ مَرْيَمَ مَثَلًا إِذَا قَوْمُكَ مِنْهُ يَصِدُّونَ﴾

५७.
आणि जेव्हा मरियमच्या पुत्राचे उदाहरण सांगितले गेले, तेव्हा त्या वृत्तांताने तुमचा जनसमूह (आनंदाने) ओरडला.

﴿وَقَالُوا أَآلِهَتُنَا خَيْرٌ أَمْ هُوَ ۚ مَا ضَرَبُوهُ لَكَ إِلَّا جَدَلًا ۚ بَلْ هُمْ قَوْمٌ خَصِمُونَ﴾

५८.
आणि ते म्हणाले की आमची उपास्ये चांगली आहेत की तो? तुम्हाला त्यांचे हे सांगणे केवळ वाद घालण्याच्या हेतूने आहे, किंबहुना हे लोक आहेतच भांडखोर.

﴿إِنْ هُوَ إِلَّا عَبْدٌ أَنْعَمْنَا عَلَيْهِ وَجَعَلْنَاهُ مَثَلًا لِبَنِي إِسْرَائِيلَ﴾

५९. तो (ईसा अलै.
) देखील केवळ एक दास मात्र आहे, ज्याच्यावर आम्ही उपकार केला आणि त्याला इस्राईलच्या संततीकरिता (आपल्या सामर्थ्याची) निशाणी बनविले.

﴿وَلَوْ نَشَاءُ لَجَعَلْنَا مِنْكُمْ مَلَائِكَةً فِي الْأَرْضِ يَخْلُفُونَ﴾

६०.
जर आम्ही इच्छिले असते तर तुमच्याऐवजी फरिश्ते बनविले असते ज्यांनी धरतीवर एकमेकांचे वारस म्हणून काम केले असते.

﴿وَإِنَّهُ لَعِلْمٌ لِلسَّاعَةِ فَلَا تَمْتَرُنَّ بِهَا وَاتَّبِعُونِ ۚ هَٰذَا صِرَاطٌ مُسْتَقِيمٌ﴾

६१. आणि निःसंशय, तो (ईसा अलै.) कयामतची निशाणी आहे, तेव्हा तुम्ही कयामतविषयी शंका करू नका आणि माझे म्हणणे मान्य करा. हाच सरळ मार्ग आहे.

﴿وَلَا يَصُدَّنَّكُمُ الشَّيْطَانُ ۖ إِنَّهُ لَكُمْ عَدُوٌّ مُبِينٌ﴾

६२. आणि सैतानाने तुम्हाला प्रतिबंध घालू नये. निःसंशय, तो तुमचा उघड शत्रू आहे.

﴿وَلَمَّا جَاءَ عِيسَىٰ بِالْبَيِّنَاتِ قَالَ قَدْ جِئْتُكُمْ بِالْحِكْمَةِ وَلِأُبَيِّنَ لَكُمْ بَعْضَ الَّذِي تَخْتَلِفُونَ فِيهِ ۖ فَاتَّقُوا اللَّهَ وَأَطِيعُونِ﴾

६३. आणि जेव्हा ईसा (अलै.
) ईशचमत्कार (मोजिजे) घेऊन आले, तेव्हा म्हणाले, मी तुमच्याजवळ ज्ञान घेऊन आलो आहे आणि अशासाठी आलो आहे की ज्या ज्या गोष्टींमध्ये तुम्ही मतभेद करता, त्या स्पष्ट कराव्यात. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय बाळगा आणि माझे आज्ञापालन करा.

﴿إِنَّ اللَّهَ هُوَ رَبِّي وَرَبُّكُمْ فَاعْبُدُوهُ ۚ هَٰذَا صِرَاطٌ مُسْتَقِيمٌ﴾

६४. माझा आणि तुमचा स्वामी व पालनकर्ता अल्लाहच आहे. तेव्हा तुम्ही सर्व त्याचीच उपासना करा. हाच सरळ मार्ग आहे.

﴿فَاخْتَلَفَ الْأَحْزَابُ مِنْ بَيْنِهِمْ ۖ فَوَيْلٌ لِلَّذِينَ ظَلَمُوا مِنْ عَذَابِ يَوْمٍ أَلِيمٍ﴾

६५. मग (इस्राईलच्या संततीच्या) समूहांनी आपसात मतभेद केला तेव्हा अत्याचारी लोकांकरिता सर्वनाश आहे. दुःखदायक दिवसाच्या अज़ाब (शिक्षा - यातने) ने.

﴿هَلْ يَنْظُرُونَ إِلَّا السَّاعَةَ أَنْ تَأْتِيَهُمْ بَغْتَةً وَهُمْ لَا يَشْعُرُونَ﴾

६६. हे लोक फक्त कयामतच्या प्रतीक्षेत आहेत की ती अचानक त्यांच्यावर येऊन कोसळावी आणि त्यांना खबरही न व्हावी.

﴿الْأَخِلَّاءُ يَوْمَئِذٍ بَعْضُهُمْ لِبَعْضٍ عَدُوٌّ إِلَّا الْمُتَّقِينَ﴾

६७. त्या दिवशी (जीवलग) मित्र देखील एकमेकांचे शत्रू बनतील, मात्र अल्लाहचे भय राखणाऱ्यांखेरीज.

﴿يَا عِبَادِ لَا خَوْفٌ عَلَيْكُمُ الْيَوْمَ وَلَا أَنْتُمْ تَحْزَنُونَ﴾

६८. हे माझ्या दासांनो! आज ना तुमच्यावर एखादे भय आहे आणि ना तुम्ही दुःखी व्हाल.

﴿الَّذِينَ آمَنُوا بِآيَاتِنَا وَكَانُوا مُسْلِمِينَ﴾

६९. ज्यांनी आमच्या आयतींवर ईमान राखले आणि जे मुस्लिम (आज्ञाधारक) बनून राहिले.

﴿ادْخُلُوا الْجَنَّةَ أَنْتُمْ وَأَزْوَاجُكُمْ تُحْبَرُونَ﴾

७०. तुम्ही आणि तुमच्या पत्न्या आनंदित व खूश होऊन जन्नतमध्ये दाखल व्हा.

﴿يُطَافُ عَلَيْهِمْ بِصِحَافٍ مِنْ ذَهَبٍ وَأَكْوَابٍ ۖ وَفِيهَا مَا تَشْتَهِيهِ الْأَنْفُسُ وَتَلَذُّ الْأَعْيُنُ ۖ وَأَنْتُمْ فِيهَا خَالِدُونَ﴾

७१. त्यांच्या चोहीबाजूंना सोन्याची ताटे आणि सोन्याचे प्याले फिरविले जातील.
यात ते सर्व काही असेल, जे मनाला आवडणारे आणि नेत्यांना सुखदायक ठरणारे असेल, आणि तुम्ही त्यात नेहमी-नेहमीकरिता राहाल.

﴿وَتِلْكَ الْجَنَّةُ الَّتِي أُورِثْتُمُوهَا بِمَا كُنْتُمْ تَعْمَلُونَ﴾

७२. आणि हीच ती जन्नत होय की तुम्ही आपल्या आचरणाच्या मोबदल्यात तिचे उत्तराधिकारी (वारस) बनविले गेले आहात.

﴿لَكُمْ فِيهَا فَاكِهَةٌ كَثِيرَةٌ مِنْهَا تَأْكُلُونَ﴾

७३. इथे तुमच्यासाठी विपुल प्रमाणात मेवे आहेत, ज्यांना तुम्ही खात राहाल.

﴿إِنَّ الْمُجْرِمِينَ فِي عَذَابِ جَهَنَّمَ خَالِدُونَ﴾

७४. निःसंशय, अपराधी लोक जहन्नमच्या शिक्षा-यातनेत सदैव राहतील.

﴿لَا يُفَتَّرُ عَنْهُمْ وَهُمْ فِيهِ مُبْلِسُونَ﴾

७५. ही (शिक्षा-यातना) कधीही त्यांच्यावरून सौम्य केली जाणार नाही आणि ते तिच्यातच नैराश्यग्रस्त पडून राहतील.

﴿وَمَا ظَلَمْنَاهُمْ وَلَٰكِنْ كَانُوا هُمُ الظَّالِمِينَ﴾

७६. आणि आम्ही त्यांच्यावर अत्याचार नाही केला, उलट ते स्वतःच अत्याचारी होते.

﴿وَنَادَوْا يَا مَالِكُ لِيَقْضِ عَلَيْنَا رَبُّكَ ۖ قَالَ إِنَّكُمْ مَاكِثُونَ﴾

७७.
ते हाक मारून म्हणतील की हे मालक! तुमचा पालनकर्ता तर आमचा पुरता नायनाट करून टाकील! तो म्हणेल, तुम्हाला तर (याच अवस्थेत नेहमी) राहावयाचे आहे.

﴿لَقَدْ جِئْنَاكُمْ بِالْحَقِّ وَلَٰكِنَّ أَكْثَرَكُمْ لِلْحَقِّ كَارِهُونَ﴾

७८. आम्ही तर तुमच्याजवळ सत्य घेऊन आलो, परंतु तुमच्यापैकी बहुतेक लोक सत्याशी तिरस्कार करणारे होते.

﴿أَمْ أَبْرَمُوا أَمْرًا فَإِنَّا مُبْرِمُونَ﴾

७९.
काय त्यांनी एखाद्या कामाचा मजबूत इरादा करून घेतला आहे? तर मग खात्री बाळगा की आम्हीही मजबूत काम करणारे आहोत.

﴿أَمْ يَحْسَبُونَ أَنَّا لَا نَسْمَعُ سِرَّهُمْ وَنَجْوَاهُمْ ۚ بَلَىٰ وَرُسُلُنَا لَدَيْهِمْ يَكْتُبُونَ﴾

८०.
काय त्यांनी असे गृहित धरले आहे की आम्ही त्यांच्या गुप्त गोष्टींना आणि त्यांच्या कानगोष्टींना ऐकत नाहीत? (निःसंशय आम्ही सर्व काही ऐकतो) किंबहुना आम्ही पाठविलेले (फरिश्ते) त्यांच्याजवळच लिहित आहेत.

﴿قُلْ إِنْ كَانَ لِلرَّحْمَٰنِ وَلَدٌ فَأَنَا أَوَّلُ الْعَابِدِينَ﴾

८१.
(तुम्ही) सांगा की, जर समजा रहमान (दयावान अल्लाह) ची एखादी संतती असती तर मी सर्वांत प्रथम उपासना करणारा राहिले असतो.

﴿سُبْحَانَ رَبِّ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ رَبِّ الْعَرْشِ عَمَّا يَصِفُونَ﴾

८२. आकाशांचा आणि धरती व अर्श (ईश-सिंहासना) चा स्वामी, त्या गोष्टींपासून पवित्र (व्यंग-दोष विरहित) आहे. ज्या (हे) सांगतात.

﴿فَذَرْهُمْ يَخُوضُوا وَيَلْعَبُوا حَتَّىٰ يُلَاقُوا يَوْمَهُمُ الَّذِي يُوعَدُونَ﴾

८३. आता तुम्ही त्यांना याच वाद-विवादात आणि खेळण्या-बागडण्यात सोडून द्या. येथेपर्यंत की त्यांची त्या दिवसाशी गाठ पडावी, ज्याचा यांना वायदा दिला जात आहे.

﴿وَهُوَ الَّذِي فِي السَّمَاءِ إِلَٰهٌ وَفِي الْأَرْضِ إِلَٰهٌ ۚ وَهُوَ الْحَكِيمُ الْعَلِيمُ﴾

८४.
आणि तोच आकाशांमध्येही पूज्य (उपासनीय) आहे आणि धरतीवरही तोच उपासना करण्यायोग्य आहे आणि तो मोठा बुद्धिकौशल्य बाळगणारा आणि संपूर्ण ज्ञान राखणारा आहे.

﴿وَتَبَارَكَ الَّذِي لَهُ مُلْكُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَمَا بَيْنَهُمَا وَعِنْدَهُ عِلْمُ السَّاعَةِ وَإِلَيْهِ تُرْجَعُونَ﴾

८५.
आणि तो मोठा शुभ-कल्याणकारी आहे, ज्याच्या हाती आकाशांचे आणि धरतीचे आणि या दोघांच्या दरम्यानचे राज्य आहे आणि कयामतचे ज्ञान देखील त्याच्याचजवळ आहे आणि त्याच्याचकडे तुम्ही सर्व परतविले जाल.

﴿وَلَا يَمْلِكُ الَّذِينَ يَدْعُونَ مِنْ دُونِهِ الشَّفَاعَةَ إِلَّا مَنْ شَهِدَ بِالْحَقِّ وَهُمْ يَعْلَمُونَ﴾

८६.
आणि ज्यांना हे लोक अल्लाहखेरीज पुकारतात, ते शिफारस करण्याचा अधिकार बाळगत नाही, तथापि (शिफारसीचा हक्क ते बाळगतात) जे सत्य गोष्टींचा स्वीकार करतील आणि त्यांना ज्ञानही असावे.

﴿وَلَئِنْ سَأَلْتَهُمْ مَنْ خَلَقَهُمْ لَيَقُولُنَّ اللَّهُ ۖ فَأَنَّىٰ يُؤْفَكُونَ﴾

८७.
जर तुम्ही त्यांना विचाराल की त्यांना कोणी निर्माण केले तर हे अवश्य उत्तर देतील की अल्लाहने, मग हे कोठे उलट जात आहेत?

﴿وَقِيلِهِ يَا رَبِّ إِنَّ هَٰؤُلَاءِ قَوْمٌ لَا يُؤْمِنُونَ﴾

८८.
आणि त्यांचे (पैगंबरांचे अधिकांश) हे म्हणणे की हे माझ्या पालनकर्त्या! निःसंशय, हे असे लोक आहेत, जे ईमान राखत नाहीत.

﴿فَاصْفَحْ عَنْهُمْ وَقُلْ سَلَامٌ ۚ فَسَوْفَ يَعْلَمُونَ﴾

८९. तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून तोंड फिरवून घ्या आणि (निरोपाचा) सलाम सांगा. त्यांना (स्वतःलाच) माहीत पडेल.

الترجمات والتفاسير لهذه السورة: