الطور

تفسير سورة الطور

الترجمة الماراتية

मराठी

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

﴿بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ وَالطُّورِ﴾

१. शपथ आहे तूरची

﴿وَكِتَابٍ مَسْطُورٍ﴾

२. आणि लिखित ग्रंथाची.

﴿فِي رَقٍّ مَنْشُورٍ﴾

३. जो पातळ चामड्याच्या खुल्या पृष्ठांमध्ये आहे.

﴿وَالْبَيْتِ الْمَعْمُورِ﴾

४. आणि आबाद घराची.

﴿وَالسَّقْفِ الْمَرْفُوعِ﴾

५. आणि बुलंद छताची.

﴿وَالْبَحْرِ الْمَسْجُورِ﴾

६. आणि उफाळलेल्या सागराची.

﴿إِنَّ عَذَابَ رَبِّكَ لَوَاقِعٌ﴾

७. निःसंशय, तुमच्या पालनकर्त्याचा प्रकोप होईलच.

﴿مَا لَهُ مِنْ دَافِعٍ﴾

८. त्याला कोणी रोखणारा नाही.

﴿يَوْمَ تَمُورُ السَّمَاءُ مَوْرًا﴾

९. ज्या दिवशी आकाश थरथरु लागेल.

﴿وَتَسِيرُ الْجِبَالُ سَيْرًا﴾

१०. आणि पर्वत चालायला लागतील.

﴿فَوَيْلٌ يَوْمَئِذٍ لِلْمُكَذِّبِينَ﴾

११. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांचा सर्वनाश आहे.

﴿الَّذِينَ هُمْ فِي خَوْضٍ يَلْعَبُونَ﴾

१२. जे आपल्या वाह्यात गोष्टींमध्ये खेळत बागडत आहेत.

﴿يَوْمَ يُدَعُّونَ إِلَىٰ نَارِ جَهَنَّمَ دَعًّا﴾

१३. ज्या दिवशी त्यांना धक्के देऊन जहन्नमच्या आगीकडे आणले जाईल.

﴿هَٰذِهِ النَّارُ الَّتِي كُنْتُمْ بِهَا تُكَذِّبُونَ﴾

१४. हीच ती (जहन्नमची) आग होय, जिला तुम्ही खोटे ठरवित होते.

﴿أَفَسِحْرٌ هَٰذَا أَمْ أَنْتُمْ لَا تُبْصِرُونَ﴾

१५. (आता सांगा) काय ही जादू आहे? की तुम्ही पाहातच नाहीत?

﴿اصْلَوْهَا فَاصْبِرُوا أَوْ لَا تَصْبِرُوا سَوَاءٌ عَلَيْكُمْ ۖ إِنَّمَا تُجْزَوْنَ مَا كُنْتُمْ تَعْمَلُونَ﴾

१६. दाखल व्हा यात (जहन्नममध्ये) आता तुमचे धीर-संयम राखणे आणि न राखणे तुमच्यासाठी सारखेच आहे. तुम्हाला केवळ तुमच्या कर्मांचा मोबदला दिला जाईल.

﴿إِنَّ الْمُتَّقِينَ فِي جَنَّاتٍ وَنَعِيمٍ﴾

१७. निःसंशय, नेक सदाचारी लोक जन्नतमध्ये सुखांमध्ये आहेत.

﴿فَاكِهِينَ بِمَا آتَاهُمْ رَبُّهُمْ وَوَقَاهُمْ رَبُّهُمْ عَذَابَ الْجَحِيمِ﴾

१८.
त्यांना, त्यांच्या पालनकर्त्याने जे देऊन ठेवले आहे त्यावर खूश आहेत आणि त्यांना त्यांच्या पालनकर्त्याने जहन्नमच्या अज़ाब (शिक्षा-यातने) पासूनही वाचविले.

﴿كُلُوا وَاشْرَبُوا هَنِيئًا بِمَا كُنْتُمْ تَعْمَلُونَ﴾

१९. तुम्ही मजेने खात-पीत राहा, त्या कर्मांच्या मोबदल्यात जी तुम्ही करीत होते.

﴿مُتَّكِئِينَ عَلَىٰ سُرُرٍ مَصْفُوفَةٍ ۖ وَزَوَّجْنَاهُمْ بِحُورٍ عِينٍ﴾

२०.
बरोबरीने मांडलेल्या सुंदर आसनांवर तक्के लावून, आणि आम्ही त्याचा विवाह मोठ्या नेञाच्या हूर (परीं) शी करविला आहे.

﴿وَالَّذِينَ آمَنُوا وَاتَّبَعَتْهُمْ ذُرِّيَّتُهُمْ بِإِيمَانٍ أَلْحَقْنَا بِهِمْ ذُرِّيَّتَهُمْ وَمَا أَلَتْنَاهُمْ مِنْ عَمَلِهِمْ مِنْ شَيْءٍ ۚ كُلُّ امْرِئٍ بِمَا كَسَبَ رَهِينٌ﴾

२१.
आणि ज्या लोकांनी ईमान राखले, आणि त्यांच्या संततीनेही ईमान राखण्यात त्यांचे अनुसरण केले, आम्ही त्यांच्या संततीला त्यांच्यापर्यंत पोहचवू आणि आम्ही त्यांच्या कर्मांमधून काहीच कमी करणार नाही. प्रत्येक मनुष्य आपापल्या कर्मांच्या बदली गहाण आहे.

﴿وَأَمْدَدْنَاهُمْ بِفَاكِهَةٍ وَلَحْمٍ مِمَّا يَشْتَهُونَ﴾

२२. आणि आम्ही त्यांच्यासाठी मेवे आणि स्वादिष्ट मांसाची अधिकता करू.

﴿يَتَنَازَعُونَ فِيهَا كَأْسًا لَا لَغْوٌ فِيهَا وَلَا تَأْثِيمٌ﴾

२३.
(आनंदाने) ते एकमेकांपासून (मद्याचे) प्याले हिसकावून घेत असतील, त्या मद्याच्या स्वादात ना वाह्यात गोष्टी बोलतील आणि ना अपराध असेल.

﴿۞ وَيَطُوفُ عَلَيْهِمْ غِلْمَانٌ لَهُمْ كَأَنَّهُمْ لُؤْلُؤٌ مَكْنُونٌ﴾

२४.
आणि त्यांच्या चारी बाजूला सेवेसाठी (सेवक म्हणून) लहान मुले फिरत असतील, जणू काही ते मोती होते, ज्यांना लपवून ठेवले होते.

﴿وَأَقْبَلَ بَعْضُهُمْ عَلَىٰ بَعْضٍ يَتَسَاءَلُونَ﴾

२५. आणि ते आपसात एकमेकांकडे तोंड करून विचारपूस करतील.

﴿قَالُوا إِنَّا كُنَّا قَبْلُ فِي أَهْلِنَا مُشْفِقِينَ﴾

२६. म्हणतील की याच्यापूर्वी आपल्या कुटुंबियांमध्ये फार भय राखत होतो.

﴿فَمَنَّ اللَّهُ عَلَيْنَا وَوَقَانَا عَذَابَ السَّمُومِ﴾

२७.
तेव्हा अल्लाहने आमच्यावर फार मोठा उपकार केला आणि आम्हाला होरपळून टाकणाऱ्या अति उष्ण हवेच्या प्रकोपा (अज़ाब) पासून वाचविले.

﴿إِنَّا كُنَّا مِنْ قَبْلُ نَدْعُوهُ ۖ إِنَّهُ هُوَ الْبَرُّ الرَّحِيمُ﴾

२८. आम्ही याच्या पूर्वीही त्याला पुकारत होतो. निःसंशय, तो मोठा उपकार करणारा आणि मोठा दया करणारा आहे.

﴿فَذَكِّرْ فَمَا أَنْتَ بِنِعْمَتِ رَبِّكَ بِكَاهِنٍ وَلَا مَجْنُونٍ﴾

२९. तेव्हा तुम्ही समजावित राहा, कारण की तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कृपेने ना तर ज्योतिषी आहात, ना वेडसर.

﴿أَمْ يَقُولُونَ شَاعِرٌ نَتَرَبَّصُ بِهِ رَيْبَ الْمَنُونِ﴾

३०. काय (काफिर) असे म्हणतात की हा कवी आहे, आम्ही त्याच्यासाठी काल चक्रा (अर्थात मृत्यु) ची प्रतीक्षा करीत आहोत.

﴿قُلْ تَرَبَّصُوا فَإِنِّي مَعَكُمْ مِنَ الْمُتَرَبِّصِينَ﴾

३१. (तुम्ही) सांगा की तुम्ही प्रतीक्षा करा मी देखील तुमच्यासोबत प्रतीक्षा करणाऱ्यांपैकी आहे.

﴿أَمْ تَأْمُرُهُمْ أَحْلَامُهُمْ بِهَٰذَا ۚ أَمْ هُمْ قَوْمٌ طَاغُونَ﴾

३२. काय त्यांच्या अकला त्यांना हेच शिकवितात? किंवा हे लोक आहेतच उध्दट (विद्रोही)?

﴿أَمْ يَقُولُونَ تَقَوَّلَهُ ۚ بَلْ لَا يُؤْمِنُونَ﴾

३३. काय हे म्हणता की या (पैगंबरा) ने (कुरआन) स्वतः रचले आहे, वस्तुतः हे ईमान राखत नाहीत.

﴿فَلْيَأْتُوا بِحَدِيثٍ مِثْلِهِ إِنْ كَانُوا صَادِقِينَ﴾

३४. बरे, जर हे सच्चे आहेत तर मग यासारखी एक तरी गोष्ट यांनी आणून दाखवावी.

﴿أَمْ خُلِقُوا مِنْ غَيْرِ شَيْءٍ أَمْ هُمُ الْخَالِقُونَ﴾

३५.
काय हे एखाद्या (निर्माण करणाऱ्या) च्या विना स्वतः (आपोआप) निर्माण झाले आहेत? किंवा हे स्वतः निर्माण करणारे आहेत?

﴿أَمْ خَلَقُوا السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ ۚ بَلْ لَا يُوقِنُونَ﴾

३६. काय त्यांनीच आकाशांना आणि जमिनीला निर्माण केले आहे? किंबहुना हे विश्वास न राखणारे लोक आहेत.

﴿أَمْ عِنْدَهُمْ خَزَائِنُ رَبِّكَ أَمْ هُمُ الْمُصَيْطِرُونَ﴾

३७. अथवा काय यांच्याजवळ तुमच्या पालनकर्त्याचे खजिने आहेत? किंवा (त्या खजिन्यांचे) हे संरक्षक आहेत?

﴿أَمْ لَهُمْ سُلَّمٌ يَسْتَمِعُونَ فِيهِ ۖ فَلْيَأْتِ مُسْتَمِعُهُمْ بِسُلْطَانٍ مُبِينٍ﴾

३८.
किंवा यांच्याजवळ एखादी शिडी आहे, जिच्यावर चढून हे ऐकतात? (जर असे आहे) तर ऐकणाऱ्याने एखादे स्पष्ट प्रमाण सादर करावे.

﴿أَمْ لَهُ الْبَنَاتُ وَلَكُمُ الْبَنُونَ﴾

३९. काय अल्लाहकरिता सर्व कन्या आहेत आणि तुमच्यासाठी पुत्र?

﴿أَمْ تَسْأَلُهُمْ أَجْرًا فَهُمْ مِنْ مَغْرَمٍ مُثْقَلُونَ﴾

४०. काय तुम्ही यांच्याकडून काही मजुरी मागता की हे त्या ओझ्याने दाबले जात आहेत?

﴿أَمْ عِنْدَهُمُ الْغَيْبُ فَهُمْ يَكْتُبُونَ﴾

४१. काय यांच्याजवळ परोक्ष ज्ञान आहे की हे लिहून घेत असतात?

﴿أَمْ يُرِيدُونَ كَيْدًا ۖ فَالَّذِينَ كَفَرُوا هُمُ الْمَكِيدُونَ﴾

४२. काय हे लोक एखादा कावेबाजपणा करू इच्छितात? तर (विश्वास ठेवा) की कपट कारस्थान करणारा गट काफिरांचा आहे.

﴿أَمْ لَهُمْ إِلَٰهٌ غَيْرُ اللَّهِ ۚ سُبْحَانَ اللَّهِ عَمَّا يُشْرِكُونَ﴾

४३.
काय अल्लाहखेरीज त्यांचा कोणी दुसरा माबूद (उपास्य) आहे? (कदापि नाही) अल्लाह त्यांच्या सहभागी ठरविण्यापासून (शुद्ध) आणि पवित्र आहे.

﴿وَإِنْ يَرَوْا كِسْفًا مِنَ السَّمَاءِ سَاقِطًا يَقُولُوا سَحَابٌ مَرْكُومٌ﴾

४४. जर हे लोक आकाशाचा एखादा तुकडा जरी कोसळताना पाहतील तरी हेच म्हणतील की हे थरावर थर ढग आहेत.

﴿فَذَرْهُمْ حَتَّىٰ يُلَاقُوا يَوْمَهُمُ الَّذِي فِيهِ يُصْعَقُونَ﴾

४५.
तेव्हा तुम्ही त्यांना सोडा, येथे पर्यर्ंत की यांची आपल्या त्या दिवसाशी भेट व्हावी ज्यात हे बेशुद्ध केले जातील.

﴿يَوْمَ لَا يُغْنِي عَنْهُمْ كَيْدُهُمْ شَيْئًا وَلَا هُمْ يُنْصَرُونَ﴾

४६. ज्या दिवशी त्यांना त्यांची चाल (खेळी) काहीच कामी येणार नाही आणि ना त्यांना मदत केली जाईल.

﴿وَإِنَّ لِلَّذِينَ ظَلَمُوا عَذَابًا دُونَ ذَٰلِكَ وَلَٰكِنَّ أَكْثَرَهُمْ لَا يَعْلَمُونَ﴾

४७.
निःसंशय, अत्याचारी लोकांकरिता याखेरीजही अन्य शिक्षा-यातना आहेत, परंतु त्या लोकांपैकी अधिकांश लोक हे जाणत नाहीत.

﴿وَاصْبِرْ لِحُكْمِ رَبِّكَ فَإِنَّكَ بِأَعْيُنِنَا ۖ وَسَبِّحْ بِحَمْدِ رَبِّكَ حِينَ تَقُومُ﴾

४८. तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाच्या प्रतीक्षेत धीर - संयम राखा.
निःसंशय, तुम्ही आमच्या डोळ्यांसमोर आहात आणि सकाळी जेव्हा तुम्ही उठाल, आपल्या पालनकर्त्याची पवित्रतेसह प्रशंसा करा.

﴿وَمِنَ اللَّيْلِ فَسَبِّحْهُ وَإِدْبَارَ النُّجُومِ﴾

४९. आणि रात्री देखील त्याचे महिमागान करा आणि ताऱ्यांच्या अस्तास जाण्याच्या वेळीही.

الترجمات والتفاسير لهذه السورة: