الواسع
كلمة (الواسع) في اللغة اسم فاعل من الفعل (وَسِعَ يَسَع) والمصدر...
१. निःसंशय, आम्ही नूह (अलै.) यांना त्यांच्या जनसमूहाकडे पाठविले की आपल्या जनसमूहाला खबरदार करा (आणि सावध करा) यापूर्वी की त्यांच्याजवळ दुःखदायक अज़ाब (शिक्षा - यातना) येऊन पोहचावा.
२. (नूह अलै.) म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! मी तुम्हाला स्पष्टपणे खबरदार करणारा आहे.
३. की तुम्ही अल्लाहची उपासना करा आणि त्याचेच भय बाळगा आणि माझे म्हणणे मान्य करा.
४. तर तो तुमचे अपराध माफ करील, आणि तुम्हाला एका निर्धारित वेळे पर्यर्ंत सवड देईल.१ निःसंशय, अल्लाहचा वायदा (निर्धारित समय) जेव्हा येतो, तेव्हा तो टळत नाही. तुम्हाला हे माहीत असते तर (बरे झाले असते!)
५. (नूह) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! मी आपल्या जनसमूहाच्या लोकांना रात्रंदिवस तुझ्याकडे बोलाविले आहे.
६. तथापि माझ्या बोलाविण्याने हे लोक पळ काढण्यात आणखी वाढतच गेले.
७.
आणि जेव्हा जेव्हा मी त्यांना बोलाविले, यासाठी की तू त्यांना माफ करावे, तेव्हा त्यांनी आपली बोटे आपल्या कानात खुपसलीत आणि आपली वस्त्रे (अंगावर) टाकून घेतली, आणि अडून राहिले व मोठा अहंकार केला.
९. आणि निःसंशय, मी त्यांना उघडपणेही सांगितले व गुपचुपरित्याही.
१०. आणि मी म्हणालो की आपल्या पालनकर्त्याकडून आपले अपराध माफ करवून घ्या (आणि क्षमा-याचना करा). निःसंशय, तो मोठा माफ करणारा आहे.
११. तो तुमच्यावर आकाशाला खूप पर्जन्यवृष्टी करताना सोडील.
१२. आणि तुम्हाला धन-संपत्ती आणि संततीच्या विपुलतेत वाढविल, आणि तुम्हाला बाग प्रदान करील व तुमच्यासाठी प्रवाह जारी करील.
१३. तुम्हाला झाले तरी काय की तुम्ही अल्लाहच्या महानतेवर विश्वास करीत नाही.
१५. काय तुम्ही पाहत नाही की अल्लाहने कशा प्रकारे वर खाली सात आकाश निर्माण केले आहेत?
१६. आणि त्या चंद्राला खूप झगमगणारा बनविले आणि सूर्याला तेजस्वी दीप बनविले.
१७. आणि तुम्हाला जमिनीतून (एका विशेष पद्धतीने) उगविले (निर्माण केले आहे)
१८. मग तुम्हाला तिच्यातच परतविल आणि (एका विशेषरितीने) पुन्हा तुम्हाला बाहेर काढील.
२०. यासाठी की तुम्ही तिच्या विस्तृत मार्गावर चालावे फिरावे.
२१.
(नूह) म्हणाले की हे माझ्या पालनकर्त्या! त्या लोकांनी माझी अवज्ञा केली, आणि अशांचे आज्ञापालन केले, ज्यांच्या संपत्ती व संततीने त्यांच्या नुकसानातच भर घातली.
२३. आणि ते म्हणाले की कधीही आपल्या दैवतांना सोडू नका, आणि ना वद्द, सुवाअ, यगूस, यअुक आणि नस्रला (सोडा).१
२४. आणि त्यांनी अनेक लोकांना मार्गभ्रष्ट केले. (हे पालनकर्त्या!) तू या अत्याचारी लोकांच्या मार्गभ्रष्टतेत आणखी वाढ कर.
२५. हे लोक आपल्या अपराधांपायी (पाण्यात) बुडविले गेले आणि जहन्नममध्ये पोहचविले गेले आणि अल्लाहखेरीज त्यांना आपला कोणी मदत करणारा आढळला नाही.
२६. आणि (नूह) म्हणाले की हे माझ्या पालनकर्त्या! तू या धरतीवर कोणत्याही काफिराला (इन्कार करणाऱ्याला) वास्तव्य करणारा सोडू नकोस.
२७. जर त्यांना तू सोडशील तर निःसंशय हे तुझ्या दुसऱ्या दासांनाही मार्गभ्रष्ट करतील आणि हे दुष्कर्म करणाऱ्या काफिरांनाच जन्म देतील.
२८.
हे माझ्या पालनकर्त्या! तू मला आणि माझ्या माता-पित्याला आणि जे देखील ईमान राखून माझ्या घरात येतील आणि समस्त ईमानधारक पुरुषांना आणि समस्त ईमानधारक स्त्रियांना माफ कर आणि काफिरांना विनाशाखेरीज अन्य कोणत्याही गोष्टीत वृद्धिंगत करू नकोस.