العظيم
كلمة (عظيم) في اللغة صيغة مبالغة على وزن (فعيل) وتعني اتصاف الشيء...
२४. आणि म्हणाला, ही तर फक्त जादू आहे, जी साध्य केली जाते.
३१. आणि आम्ही जहन्नमचे रक्षक केवळ फरिश्ते ठेवले आहेत आणि आम्ही त्यांची संख्या केवळ काफिरांच्या कसोटीकरिता निर्धारित केली आहे.
यासाठी की ग्रंथधारकांनी विश्वास करावा आणि ईमान राखणाऱ्यांच्या ईमानात वृद्धी व्हावी आणि ग्रंथधारक व मुस्लिमांनी संशय करू नये, आणि ज्यांच्या मनात रोग आहे त्यांनी व काफिरांनी म्हणावे की या अशा उदाहरणाने अल्लाहला काय अभिप्रेत आहे? अशा प्रकारे अल्लाह, ज्याला इच्छितो मार्गभ्रष्ट करतो आणि ज्याला इच्छितो सन्मार्ग दाखवितो. आणि तुमच्या पालनकर्त्याच्या लष्करांना त्याच्याखेरीज कोणीही जाणत नाही. हा समस्त मानवांकरिता (परिपूर्ण) बोध (आणि भलाई) आहे.
३७. त्या माणसांकरिता, जे तुमच्यापैकी पुढे जाऊ इच्छितील किंवा मागे हटू इच्छितील.
४५. आणि आम्ही निरर्थक गोष्ट (इन्कार) करणाऱ्यांसोबत निरर्थक गोष्टीत व्यस्त राहात होतो.
४८. तेव्हा त्यांना शिफारस करणाऱ्यांची शिफारस उपयोगी पडणार नाही.
४९. त्यांना झाले तरी काय की ते उपदेशापासून तोंड फिरवित आहेत.
५२. किंबहुना त्यांच्यापैकी प्रत्येक मनुष्य इच्छितो की त्याला स्पष्ट ग्रंथ दिले जावेत.
५३. असे कदापि (होऊ शकत) नाही, किंबहुना हे कयामतबाबत निर्भय आहेत.
५६. आणि हे त्याच वेळी बोध ग्रहण करतील, जेव्हा अल्लाह इच्छिल. तो या गोष्टीस पात्र आहे की त्याचे भय राखावे आणि यासही पात्र की त्याने माफ करावे.